Pro Kabaddi 2023 Saam Tv
क्रीडा

Pro Kabaddi 2023: बंगाल वॉरियर्स युपी योद्धाजची एकमेकांविरुद्धात जोरदार झुंज; वॉरियर्सचा दुसरा सामना अनिर्णित

Pro Kabaddi 2023 : या स्पर्धेतील आजचा सामना तसाच रोमांच आणि थरारक झाला. दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. या स्पर्धेतील हा दुसरा टाय सामना ठरला. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यात बंगाल वॉरियर्स संघाचा समावेश होता.

Bharat Jadhav

Pro Kabaddi 2023 Bengal Warriors vs UP yoddhas:

प्रो कबड्डी लीग स्पर्धेचं हे दहावे सत्र आहे. या सत्रात सर्व संघ दमदार खेळ करत आहे. सर्व संघ एकमेकांना तोडीस तोड देत सामना खेळत आहेत. या स्पर्धेतील आजचा सामना तसाच रोमांच आणि थरारक झाला. दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. या चुरशीच्या सामन्यात बंगाल वॉरियर्स विरुध्द युपी योद्धाज संघाला अखेर ३७-३७ गुण मिळाले आणि हा सामना बरोबरीत सुटला. या स्पर्धेतील हा दुसरा टाय सामना ठरला. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यात बंगाल वॉरियर्स संघाचा समावेश होता.(Latest News)

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या लढतीत दोन्ही संघांनी चांगला खेळ खेळला. युपी योद्धाज संघाचा सुरींदर गील याने सुपर रेडच्या साहाय्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मनींदर सिंग आणि नितीन कुमार यांच्या कामगिरीमुळे बंगाल वॉरियर्स संघाने त्यांना जशास तसे उत्तर दिले. योद्धाज संघाचा कर्णधार परदीप नरवालला पहिला गुण मिळवण्यासाठी तब्बल १२ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योद्धाजच्या संघाने खंबीर राहत वॉरियर्सच्या पटूंना त्याच्यावर दबाव टाकू दिला नाही. सामन्यात दोनवेळा युपी योद्धाजचे केवळ ४ खेळाडू मैदानात होते, तरीही वॉरियर्सच्या चढाई पटूना त्याचा फायदा घेता आला नाही. नितेशने मनिंदरची केलेली पकड आणि विजय मलिकने मिळवलेले बोनस गुण यामुळे योद्धाजने मध्यांतराला १८-१४ अशी आघाडी घेतली. संपूर्ण पूर्वार्धात एकाही संघाला लोन चढवता आला नाही.

सामना संपताना खेळात रंगत वाढली. गुरदीपने मनिंदरची सुपर टॅकलद्वारे पकड केली. तेव्हा योद्धाजकडे २१-१७ अशी आघाडी होती. परंतु श्रीकांत जाधवने एकाच चढाईत दोन खेळाडू बाद केले. जाधवच्या चढाईने योद्धाजचे सर्व गडी बाद करून त्यांच्यावर लोन चढवलं. तेव्हा वॉरियर्सकडे २४-२३ अशी आघाडी होती.

मात्र सुरींदरने सुपर रेड करताना संघाला १० वा गुण मिळवून देत पुन्हा आघाडीवर नेलं. उत्कृष्ट चढायांच्या जोरावर योद्धाज संघाने पाच मिनिटे ३५-३० अशी आघाडी कायम ठेवली होती. मात्र संपूर्ण लढतीतील परंपरा कायम राखताना उत्कृष्ट आणि आक्रमणाच्या समिश्र कामगिरीमुळे वॉरियर्सने लवकरच सामन्यात पुनरागमन केले आणि ३६-३६ अशी बरोबरी केली. अखेरच्या क्षणात दोन्ही संघांनी एक गुण मिळवल्याने सामना ३७-३७ असा बरोबरीत सुटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT