beating australia in mohali is not easy for india know india vs australia head to head record in mohali cricket news in marathi  Saam tv news
Sports

IND vs AUS,1st ODI: मोहालीत ऑस्ट्रेलियाला हरवणं कठीण नव्हे तर अशक्यच! पाहा टीम इंडियाची चिंता वाढवणारा रेकॉर्ड

India vs Australia Head To Head Record: पाहा मोहालीत खेळताना कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड.

Ankush Dhavre

India vs Australia Head To Head Record:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका रंगणार आहे. दोन्ही संघ ३ वनडे सामने खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड.

आतापर्यंतची जर आकडेवारी पाहिली तर मोहालीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं कठीण आहे. मोहालीत खेळताना ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. मात्र आशिया चषक जिंकून आलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.

तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना २-३ ने मालिका गमावून आला आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघ मोहालीत ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर देताना डिश येऊ शकतो.

भारतात खेळताना असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड..

गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने वनडेत दमदार कामगिरी केली आहे. मात्र भारतात खेळताना जर दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर ऑस्ट्रेलियाचा संघ वरचड आहे. वनडेत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ १४६ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान ८२ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तर ५४ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. तर भारतात खेळताना दोन्ही संघ ६७ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला ३२ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ३० सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. (Latest sports updates)

वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन,सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, वाशिंगटन सुंदर 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील जांभूळवाडी तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Dream Astrology: स्वप्नात 'या' गोष्टी दिसणं असतं शुभ, धनलाभागाचे मिळतात संकेत

Sindhudurg Tourism : हिवाळ्यात सिंधुदुर्गमधील 'हे' अनोखं ठिकाण पाहा, आयुष्यभर ट्रिप विसरणार नाही

Sangli : सांगलीत 'मुळशी पॅटर्न'! दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: भाजपचा मास्टरस्ट्रोक, NCP शरद पवार गटाला झटका; बड्या नेत्यासह सरपंच-उपसरपंचांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT