Team India : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. ऑस्ट्रेलिया ३-१ च्या आघाडीने १० वर्षांनी ही कसोटी मालिका जिंकली. यात धर्तीवर बीसीसीआयचे नवे सचिव देवजित सैकिया यांनी अजित आगरकर यांना संघाच्या निवडीबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. अजित आगरकर हे निवड समितीचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयच्या येत्या बैठकीमध्ये निवडप्रक्रियेचा निर्णय 'कठोर संदेश' देणारा असावा असे सैकिया यांनी म्हटले आहे. त्यांचे हे वक्तव्य रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना उद्देशून असल्याचे म्हटले जात आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या न्यूझीलंडसमोर झालेल्या पराभवामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर टीका झाली होती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराटने पहिल्या सामन्यात शतक ठोकले. पण त्यानंतर त्याला एकाही डावात चांगला खेळ करता आला नाही. विराटप्रमाणे, रोहित शर्माचासुद्धा खराब फॉर्म सुरु आहे. त्याने कसोटी मालिकेतील ३ सामन्यांमध्ये फक्त ३१ धावा केल्या. खराब फॉर्ममुळे त्याला शेवटच्या सामन्यातून वगळ्यात आले.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या खराब फॉर्ममुळे चाहत्यांना त्यांच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्याची चिंता आहे. या मुद्द्यावरुन वाद-विवाद देखील होत आहे. त्यांच्या निवृत्तीच्या अफवादेखील उडत होत्या. या एकूण परिस्थितीमध्ये देवजित सैकिया यांनी अप्रत्यक्षपणे केलेल्या विराट आणि रोहितच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्यावरील विधानामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान या प्रकरणावर अजित आगरकर पुढे काय निर्णय घेतील याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दैनिक जागरणला बीसीसीआयच्या बैठकीसंबंधित माहिती दिली. "कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो. बोर्डाने काही खेळाडूंवर कडक करावाई करावी. इंटरनेटवर लोक आपल्या आवडत्या खेळाडूंचे गुणगान गातात. पण त्यानुसार बीसीसीआयला काम करता येत नाही. आता नवीन संघ निवडण्याची गरज आहे", असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. दरम्यान बीसीसीआयच्या बैठकीमध्ये संघाच्या निवडीसंबंधित कोणते निर्णय घेतले जातील याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.