Yuzvendra Chahal: घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना चहलसोबत दिसलेली ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

Yuzvendra Chahal- Dhanashree Verma Divorce: भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
Yuzvendra Chahal: घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना चहलसोबत दिसलेली ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?
yuzvendra chahaltwitter
Published On

भारतीय संघातील स्टार फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल सध्या तुफान चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एकमेकांसोबत असलेले फोटो डिलीट केले.

यासह दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. आता दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरु असताना, युझवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत दिसून आला आहे. ती मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या.

द न्यू इंडियने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, युझवेंद्र चहल मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका मिस्ट्री गर्लसोबत दिसून आला आहे. या व्हिडिओमध्ये चहलने पांढऱ्या रंगाचं ओव्हरसाईज टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे.

तर चहलसोबत एक मुलगी असल्याचं दिसून येत आहे. ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? हे कळू शकलेलं नाही. ज्यावेळी फोटोग्राफर्स चहलचा फोटो क्लिक करत होते, त्यावेळी ती मिस्ट्री गर्ल आपला चेहरा लपवताना दिसून आली.

Yuzvendra Chahal: घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना चहलसोबत दिसलेली ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?
IND vs AUS: BGT गमावताच विराट- रोहित निवृत्ती घेणार? गौतम गंभीर काय म्हणाला?

दोघांनी एकमेकांना केलं अनफॉलो

धनश्री वर्मा नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत राहिली आहे. दोघेही इंस्टाग्रामवर फोटो शेअर करायचे. त्यानंतर दोघांनीही एकमेकांचे फोटो डिलीट केले. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं. त्यानंतर दोघांचाही घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. यापूर्वी २०२२ मध्ये धनश्रीने काहीतरी गडबड असल्याचे संकेत दिले होते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चहल नाव काढून टाकलं होतं.

Yuzvendra Chahal: घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना चहलसोबत दिसलेली ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?
IND vs AUS,BGT: बुमराह एकटाच नडला! रोहित- विराट फ्लॉप, नवखा रेड्डी सुसाट; 11 खेळाडूंचं रिपोर्टकार्ड

२०२० मध्ये अडकले होते विवाह बंधनात

दोघांचाही अधिकृतरित्या घटस्फोट झालेला नाही. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कुठलीही प्रतिक्रीया दिलेली नाही. दोघेही २०२० मध्ये विवाह बंधनात अडकले होते. धनश्री वर्मा डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. यासह ती डेंन्टिस्टही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com