jasprit bumrah twitter
Sports

Team India: बुमराह संघात कायम राहणार की हर्षितला जॅकपॉट लागणार? BCCI काय निर्णय घेणार?

Team India Squad For ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम संघ जाहीर करण्याची आज शेवटची तारीख आहे. दरम्यान जसप्रीत बुमराहबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Ankush Dhavre

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. मात्र जसप्रीत बुमराह ही स्पर्धा खेळणार की नाही? हा प्रश्न अजूनही कायम आहे. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. जसप्रीत बुमराहचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

मात्र तो पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळेच इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान आज (११ फेब्रुवारी) बुमराहच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी सर्व ८ संघांनी आपल्या स्क्वाडची घोषणा केली आहे. मात्र संघात फेरबदल करण्याची मुदत ही ११ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली आहे. भारतीय संघातील उर्वरित सर्व खेळाडूंचं स्थान जवळ जवळ निश्चित आहे.

फक्त बुमराहच्या फिटनेसमुळे बीबीसीआय वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. नुकताच बंगळुरूत बुमराहच्या पाठीचा स्कॅन करण्यात आला. दरम्यान कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी बीसीसीआय मेडिकल स्टाफ आणि निवडकर्त्यांची भेट घेऊ शकते.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत झाली दुखापत

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत जसप्रीत बुमराहने संपूर्ण मालिकेत शानदार गोलंदाजी केली. या मालिकेत तो सर्वाधिक गडी बाद करून मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

त्यानंतर चौथ्या कसोटीत तो दुखापतग्रस्त झाला होता. मात्र पाचव्या कसोटीतील शेवटच्या दिवशी त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून तो संघात कमबॅक करू शकलेला नाही.

भारताला जर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची असेल तर, जसप्रीत बुमराह संघात असणं अतिशय गरजेचं असणार आहे. कारण आयसीसीच्या स्पर्धेत खेळाडूंवर अतिरिक्त दबाव असतो. हा दबाव झेलण्यासाठी बुमराहसारखा अनुभवी खेळाडू संघात असणं अतिशय गरजेचं आहे. आता बीसीसीआय काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जर जसप्रीत बुमराहला वगळण्यात आलं, तर त्याच्या जागी हर्षित राणाचा संघात समावेश केला जाऊ शकतो. कारण रिप्लेसमेंट म्हणून हर्षितच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रविंद्र जडेजा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT