ind vs aus yandex
Sports

IND vs AUS: BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय! मालिका सुरु असतानाच 3 खेळाडू मायदेशी परतणार

3 Indian Players Will Return In India: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरु असतानाच ३ भारतीय खेळाडू मायदेशी परतणार आहेत. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरु आहे. मालिकेतील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला, तर सामन्यातील दुसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला.

आतापर्यंत एकटा ट्रेविस हेड भारतीय फलंदाजांना नडत होता .मात्र या सामन्यात स्टीव्ह स्मिथही फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळाले आहे. बॉर्डर- गावस्कर मालिकेतील तिसरा सामना सुरु असताना बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. या दौऱ्याहून ३ खेळाडू मायदेशी परतणार आहेत.

येत्या काही दिवसात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात असलेले ३ खेळाडू मायदेशी परतणार आहेत. भारतीय संघात एकापेक्षा एक धाकड वेगवान गोलंदाज आहेत.

त्यामुळे बीसीसीआयने यश दयाल, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांना विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि आकाश दीप यांना संधी दिली गेली आहे. सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये हर्षित राणा खेळताना दिसून आला होता.

तर मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी आकाश दीपचा संघात समावेश करण्यात आला आहे. पुढील दोन्ही सामन्यांमध्ये यश दयाल, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांना संधी मिळणं कठीण आहे. त्यामुळेच बीसीसीआयने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. हे तिघेही मायदेशी परतल्यानंतर, भारतीय संघात ५ वेगवान गोलंदाज शिल्लक राहतील. ज्यात मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये सुरु आहे. तर मालिकेतील चौथा सामना येत्या २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT