manoj tiwary twitter
Sports

Manoj Tiwary Tweet: रणजी ट्रॉफी बंद करण्याची मागणी करणं मनोज तिवारीच्या अंगाशी! BCCI कडून मोठी कारवाई

Manoj Tiwary On Ranji Trophy: निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धा बंद करा अशी मागणी केली होती. ही मागणी केल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे.

Ankush Dhavre

Manoj Tiwary Tweet:

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धा बंद करा अशी मागणी केली होती. ही मागणी केल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. बीसीसीआयने त्याच्या मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

मनोज तिवारीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहीले की,' आगामी हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धेला कॅलेंडरमधून काढून टाकलं गेलं पाहिजे. या स्पर्धेत खुप वाईट गोष्टी होत आहेत. समृद्ध इतिहास असलेली ही मानाची स्पर्धा वाचवण्यासाठी अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. या स्पर्धेचे सौंदर्य आणि महत्व कुठेतरी कमी होत आहे.'

मनोज तिवारीचं म्हणणं आहे की, युवा खेळाडू रणजी ट्रॉफीला प्राथमिकता न देता शॉर्ट फॉरमॅटकडे जास्त आकर्षित होत आहेत. यासह त्याने इंग्लंडच्या बॅझबॉल शैलीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचं म्हणणं आहे की, 'बॅझबॉल ही अशी टेकनिक आहे, ज्यात सामना कुठल्या परिस्थितीत आहे याचा विचार न करता आक्रमक फलंदाजी केली जाते.' (Cricket news in marathi)

नुकताच बीसीसीआयने खेळाडूंना पत्र लिहून वॉर्निंग देखील दिली होती. काही युवा खेळाडू आहेत जे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना प्राधान्य न देता आयपीएल स्पर्धेला अधिक प्राधान्य देत आहेत.

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याने मानसिक थकवा जाणवत असल्याने विश्रांती घेतल्याचा निर्णय घेतला होता. ही विनंती बीसीसीआयने मान्य केली होती. काही दिवसांपूर्वी तो आयपीएल स्पर्धेची तयारी करताना दिसून आला आहे. त्याला रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगितलं गेलं होतं. मात्र तो अजूनही आपल्या संघासोबत जोडला गेलेला नाही.

अशी राहिलीये कारकिर्द

मनोज तिवारीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला भारतीय संघासाठी १२ वनडे आणि ३ टी -२० सामने खेळण्याची संधी मिळाली. या १२ वनडे सामन्यांमध्ये त्याने २३.९२ च्या सरासरीने आणि ७१.२२ च्या स्ट्राईक रेटने २८७ धावा केल्या.

यादरम्यान त्याच्या नावे १ अर्धशतक आणि १ शतक झळकावण्याची नोंद आहे. तर टी -२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १५ च्या सरासरीने ८८.२४ च्या स्ट्राईक रेटने १५ धावा केल्या. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याला ९८ सामने खेळण्याची संधी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT