Manoj Tiwary Statement: 'माझी क्रिकेट कारकिर्द का खराब केली?' क्रिकेटला रामराम करताच मनोज तिवारीचा एमएस धोनीला सवाल

Manoj Tiwary On MS Dhoni: दरम्यान क्रिकेट कारकिर्दीचा शेवट करताना त्याने एमएस धोनीला एक प्रश्न विचारला आहे. ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.
manoj tiwary
manoj tiwarysaam tv news
Published On

Manoj Tiwary Statement On MS Dhoni:

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने अखेर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तो रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगाल संघाचं नेतृत्व करताना बिहारविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला.

त्याने यापूर्वीही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवृत्तीतून माघार घेत त्याने पुन्हा एकदा मैदानावर कमबॅक करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आपल्या शेवटच्या सामन्यात त्याने बंगालला विजय मिळवून दिला.

दरम्यान क्रिकेट कारकिर्दीचा शेवट करताना त्याने एमएस धोनीला एक प्रश्न विचारला आहे. ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. मनोज तिवारीने (Manoj Tiwary) त्याला विचारलं आहे की, शतक झळकावूनही मला संघाबाहेर का ठेवण्यात आलं?

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या पोस्टमध्ये मनोज तिवारीने धोनीला (MS Dhoni) विचारलय की, 'मी गेल्या सामन्यात शतक झळकावलं होतं तरीदेखील मला संघाबाहेर का करण्यात आलं? ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ना विराट कोहली, ना रोहित शर्मा, ना सुरेश रैना, कोणीच धावा करत नव्हतं. सध्या माझ्याकडे जाणवायला काहीच नाही. मात्र मला धोनीला विचारायचं आहे की, शतक झळकावूनही मला संघाबाहेर का केलं गेलं?' मनोज तिवारीच्या या पोस्टवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. (Cricket news in marathi)

manoj tiwary
IND vs ENG 4th Test: रांची कसोटीतून रजत पाटीदारची होणार सुट्टी! हा प्रमुख खेळाडू करतोय कमबॅक

अशी राहिलीये कारकिर्द

मनोज तिवारीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला भारतीय संघासाठी ३ टी -२० आणि १२ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. या १२ वनडे सामन्यांमध्ये त्याने २३.९२ च्या सरासरीने आणि ७१.२२ च्या स्ट्राईक रेटने २८७ धावा केल्या.

manoj tiwary
Ind vs Eng 4th Test: भारत - इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना केव्हा अन् कुठे रंगणार? जाणून घ्या A to Z माहिती

यादरम्यान त्याच्या नावे १ शतक आणि १ अर्धशतक झळकावण्याची नोंद आहे. तर टी -२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १५ च्या सरासरीने ८८.२४ च्या स्ट्राईक रेटने १५ धावा केल्या. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याला ९८ सामने खेळण्याची संधी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com