ms dhoni yandex
Sports

IPL 2025: MS धोनीसाठी कायपण! बीसीसीआय आयपीएलमध्ये नवा नियम आणण्याची शक्यता; चेन्नईच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज?

IPL 2025: चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीला पुन्हा घेण्यासाठी संघाने ही रणनिती आखली आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून बीसीसीआयने सीएसकेची मागणी मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रिटेंशन पॉलिसीच्या धोरणामध्ये बदल करण्याच्या चर्चा सुरू आहेत. चेन्नई सुपर किंग्सने याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीला पुन्हा घेण्यासाठी संघाने ही रणनिती आखली आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून बीसीसीआयने सीएसकेची मागणी मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुप किंग्सच्या मागणीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जुना नियम परत आणणार आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) दिग्गज महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी धोनीला आयपीएलमध्ये उतरवण्यासाठी बोर्ड मोठे पाऊल उचलू शकते.

2008 ते 2021 दरम्यान, आयपीएलमध्ये असा नियम होता की जर एखाद्या खेळाडूने 5 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून लिलावात टाकले जाईल. हा नियम 2021 मध्ये बीसीसीआयने काढून टाकला, कारण तो कधीही वापरला गेला नाही. गेल्या महिन्यात आयपीएल संघ मालक आणि आयपीएल प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

31 जुलै रोजी झालेल्या बैठकीत चेन्नईने आपला सर्वात महत्त्वाचा खेळाडू धोनीला खेळवण्यासाठी हा नियम परत आणण्याची मागणी केली होती, तथापि, खूप कमी फ्रँचायझींनी CSK चे समर्थन केले. आता सूत्रांच्या हवाल्याने हा नियम परत येईल अशी अपेक्षा आहे. खेळाडूंचे नियमन जाहीर करताना बोर्ड याची घोषणा करू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT