BCCI  google
Sports

ऐन T20 वर्ल्ड कपदरम्यान BCCI चा मोठा निर्णय; भारतीय क्रिकेटपटूंना सोबत फॅमिली घेऊन जाता येणार नाही!

BCCI Rejects Team India Players Request: टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत येणार नाहीय. बीसीसीआयने संघ व्यवस्थापनाची ही मागणी फेटाळून लावली आहे.

Bharat Jadhav

  • टी-२० विश्वचषकात बीसीसीआयचा कठोर निर्णय

  • खेळाडूंची कुटुंबासोबत राहण्याची मागणी फेटाळली

  • आधीच ठरलेल्या धोरणाची अंमलबजावणी

ऐन टी-२० विश्वचषकावेळी भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निवासाबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतलाय. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी बीसीसीआयकडे एक खास मागणी केली होती, परंतु बोर्डाने खेळाडूंची मागणी फेटाळून लावली आहे. भारतीय खेळाडू या विश्वचषकात त्यांच्या कुटुंबियांसोबत प्रवास करू शकतात का,अशी विचारणा संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयकडे केली होती.

मात्र बीसीसीआयने संघ व्यवस्थापनाचीविनंती फेटाळून लावली. दरम्यान बीसीसीआयने आधीच त्यांच्या धोरणात खेळाडूंचे कुटुंब त्यांच्यासोबत किती दिवस राहू शकते हे सांगितले होते. या धोरणानुसार टी-२० विश्वचषकादरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली जाणार नाहीये.

खेळाडूंसाठी एक विशेष नियम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघ व्यवस्थापनाने क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी मागितली होती.त्यावर बीसीसीआयने यावर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत, पण त्यांनी यासाठी एक कालमर्यादा निश्चित केलीय. बोर्डाच्या नियमांनुसार, खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त १४ दिवस राहू शकतात.

हा नियम फक्त परदेश दौऱ्यासाठी आहे. यासाठीही एक अट ठेवण्यात आलीय. कोणताही परदेश दौरा ४५ दिवसांपेक्षा जास्त काळाचा असावा. दरम्यान आता टी-२० विश्वचषक भारतात होत आहे आणि तो एक महिना चालणार आहे, म्हणून बोर्डाने संघ व्यवस्थापनाची विनंतीला फेटाळून लावलंय.

एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार,बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, भारतीय संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला विचारले होतं की, खेळाडूंच्या पत्नी आणि भावी पत्नीसह संघासोबत प्रवास करू शकतात का आणि त्यांच्यासोबत राहू शकतात का. खेळाडूंसोबत कुटुंबांना राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. खेळाडूंची इच्छा असल्यास ते त्यांच्या कुटुंबांसाठी वेगळी व्यवस्था करू शकतात. ते त्यांच्यासोबत एकाच हॉटेलमध्ये राहू शकत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT