Mohammed Shami Saam Tv
क्रीडा

World Cupमधील चांगल्या कामगिरीचं फळ शमीला मिळणार; BCCIने केली 'या' मोठ्या पुरस्कारसाठी शिफारस

Mohammed Shami : केंद्र सरकारकडून खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येतो. खेळात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारात अर्जुनाची पुतळा, सन्मानपत्र आणि रक्कम असं या पुरस्काराचं स्वरुप असतं.

Bharat Jadhav

BCCI Recommended Mohammed Shami Name For Arjuna Award:

वर्ल्ड कपच्या सामन्यात टीम इंडियाने सलग १० सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली. मात्र एका पराभवाने टीम इंडियाला वर्ल्डकप गमवावा लागला. टीम इंडियाने खेळलेल्या त्याआधीच्या १० सामन्यांमध्ये मोहम्मद शमी जबरदस्त कामगिरी केली. शमीच्या या कामगिरीचं फळ त्याला मिळणार आहे. या कामगिरीसाठी बीसीसीआयने त्याच्या नावाची शिफारस मानाच्या अर्जुन पुरस्कारासाठी केलीय. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे.(Latest News)

अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत मोहम्मद शमीचं नाव अव्वलस्थानी आहे. एएनआयच्या माहितीनुसार शमीला अर्जुन पुरस्कार देण्यात यावं यासाठी बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केलीय. त्याआधी या यादीत मोहम्मद शमीच्या नावाचा समावेश नव्हता. मात्र बीसीसीआयच्या विनंतीनंतर अर्जुनच्या नावाचा त्या यादीत समावेश करण्यात आलाय. मात्र याबाबत अधिकृत घोषणा कुठेही करण्यात आलेली नाहीये.

मोहम्मद शमीने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. शमीने आतापर्यंत ६४ कसोटी, १०१ वनडे आणि २३ टी २० सामन्यांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलंय. शमीने कसोटीत २२९, वनडेत १९५ आणि टी२० मध्ये एकूण २४ विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद शमीने १३ व्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या. शमीने अवघ्या ७ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. शमीने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ७ विकेट्स घेत एकहाती सामना फिरवला होता. शमीच्या या निर्णायक कामगिरीमुळे टीम इंडियाने सामन्यात कमबॅक करत सामना जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT