BCCI Meeting IPL Team Owner Saam Digital
क्रीडा

BCCI Meeting IPL Team Owner : BCCI ची IPL संघांच्या मालकांसोबत बैठक; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता

IPL 2024 BCCI Meeting : आयपीएल २०२४ चा हंगाम सुरू आहे. आतापर्यंत या स्पर्धेत एकूण १३ सामने झाले आहेत. या दरम्यान बीसीसीआयने या स्पर्धेत सहभागी असलेल्या १० फ्रँचायझींच्या मालकांची बैठक बोलवली होती. या सामन्यात स्पर्घेबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

IPL 2024

आयपीएल 2024 चा हंगाम सुरू झाला असून या स्पर्धेत आतापर्यंत १३ सामने खेळले गेले आहेत. यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व 10 फ्रँचायझींच्या मालकांची बैठक बोलावली आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचं कळतयं. ही बैठक १६ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये पार पडणार आहे. याच दिवशी भारतातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर म्हणजेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे.

बैठकीला बिन्नी, जय शाह उपस्थित राहणार?

माहितीनुसार, १६ एप्रिला होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण सर्व 10 संघांच्या मालकांना पाठवण्यात आले आहे. संघांच्या मालकांसह त्यांचे सीईओ आणि ऑपरेशनल टीम देखील या बैठकीला उपस्थित राहू शकतात अशी सुचना देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंह धुमल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीचे निमंत्रण आयपीएलचे सीईओ हेमांग अमीन यांनी सर्व मालकांना पाठवल्याचं कळतयं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मालकांना पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेत बैठकीचा अजेंडा स्पष्ट केलेला नाही. माहितीनुसार, अचानक बोलावलेल्या बैठकात बीसीसीआय लिलावापूर्वी होणाऱ्या धोरणांबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ शक्तील आणि त्यानुसार लिलाव पुढील वर्षी आयोजित केले जातील. या बैठकीपूर्वी खेळाडूंना त्यांच्या संघामध्ये कायम ठेवण्याबाबत चर्चा होऊ शकते. काही फ्रँचायझींच्या मते, खेळाडूंची राखीव संख्या आठपर्यंत वाढवण्याची आवश्यकता आहे, मात्र, काही फ्रँचायझींचा या निर्णयाला विरोध आहे. आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. या विषयावर नेहमीचं वाद होतात. याबाबत बीसीसीआय ठाम भूमिका घेईल का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

SCROLL FOR NEXT