Team India saam tv
Sports

Team India : आयर्लंड, इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियात अचानक बदल; कुणाला विश्रांती, कुणाला मिळाली संधी?

Team India updated for Ireland and England t 20 series: आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी घोषित केलेल्या भारतीय संघात अचानक बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. संघातून कोण बाहेर झालं? त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी देण्यात आली? जाणून घेऊयात.

Nandkumar Joshi

भारतीय क्रिकेट संघ लवकरच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात सुरुवातीला टी २० मालिका होईल. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा केली होती. मात्र, आता अचानक या भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयकडून याबाबत माहिती देण्यात आली. या दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघातून मोहम्मद सिराज बाहेर झाला आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

सध्या अफगाणिस्तान संघ भारत दौऱ्यावर आहे. एक कसोटी सामना झाला असून, त्यात भारतीय संघानं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. एक डाव आणि ३०० धावांनी हा एकमेव कसोटी सामना जिंकला आहे. यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १३ जून रोजी खेळवला जाणार आहे.

या वनडे मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंडला जाणार आहे. तेथे दोन सामन्यांची टी २० मालिका होणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडला रवाना होईल. त्यांच्याविरुद्ध पाच सामन्यांची टी २० मालिका होईल. याच दोन टी २० मालिकांसाठी घोषित केलेल्या भारतीय संघात बदल करण्यात आला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली.

प्रसिद्ध कृष्णा खेळणार

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात नसेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली. बीसीसीआयची मेडिकल टीम आणि संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर सिराजला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. आगामी महत्वाच्या सामन्यांआधी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सिराजला विश्रांती देण्यात आली असून, प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. उर्वरित संघात कोणताही बदल नाही, असेही सांगण्यात आले.

श्रेयस अय्यर कर्णधार, वैभव सूर्यवंशीला संधी

सूर्यकुमार यादवला हटवल्यानंतर श्रेयस अय्यरची भारतीय टी २० संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे. खराब फॉर्ममुळे सूर्यकुमारला संघातही स्थान देण्यात आलेले नाही. तिलक वर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला टी २० संघात स्थान देण्यात आले आहे. वैभव सूर्यवंशीची पहिल्यांदाच संघात निवड केली आहे. मात्र, प्लेइंग ११ मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळेल की नाही, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT