ipl saam tv
Sports

IPL 2025: आता IPL मध्ये रेड बॉलने खेळावं लागणार? काय आहे BCCI चा नवा प्लान?

Red Ball Cricket Practise During IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका पाहता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जगातील सर्व खेळाडू पाकिस्तान आणि दुबईत आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर हे खेळाडू भारताची वाट धरतील. कारण या स्पर्धेनंतर आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

इथे २ महिने भारतीय खेळाडू टी २० क्रिकेट खेळताना दिसून येतील. जानेवारीपासून भारतीय खेळाडू मर्यादित षटकांची मालिका खेळताना दिसून येत आहेत. मात्र आयपीएलनंतर भारतीय संघाला कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचं आहे. त्यामुळे बीसीसीआय ही मालिका पाहता विशेष योजना राबवण्याच्या प्रयत्नात आहे. काय आहे बीसीसीआयचा प्लान? जाणून घ्या.

भारतीय खेळाडू आता व्हाईट बॉल क्रिकेट खेळताना दिसून येतील. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी रेड बॉल क्रिकेट खेळत राहावं यासाठी बीसीसीआयने खास प्लान केला आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय भारतीय खेळाडूंना रेड बॉल आणि कसोटी क्रिकेटमध्ये टचमध्ये ठेवण्यासाठी रेड बॉलनेही सराव करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. आयपीएलचे सराव सत्र सुरू असताना, खेळाडूंना रेड बॉलनेही सराव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण भारतीय संघासाठी इंग्लंडचा दौरा अतिशय महत्वाचा असणार आहे.

भारतीय कसोटी क्रिकेट संघासाठी गेली काही महिने वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हते. न्यूझीलंडचा संघ भारतात येऊन भारतीय संघाला ३–० ने हरवून गेला. त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३–१ ने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकून भारतीय संघ नव्याने सुरवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

बीसीसीआयसाठी चिंता वाढवणारी बाब म्हणजे, भारतीय संघाने आयपीएल झाल्यानंतर जितक्या वेळेस इंग्लंडचा दौरा केला आहे, त्या दौऱ्यावर भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळेच बीसीसीआयने खेळाडूंना रेड बॉलने सराव करण्याचा सल्ला दिल्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आता खेळाडू कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

Rabies Symptoms: रेबीज म्हणजे काय आणि तो का होतो? सुरुवातीची लक्षणे कोणती?

Shocking: सूनेची क्रूरता! आईसोबत मिळून सासूला झोडलं, जमिनीवर पाडून झिंज्या उपटल्या; VIDEO व्हायरल

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT