भारतीय क्रिकेटमध्ये सध्या चर्चा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्याची सुरू आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, 2027 च्या वनडे वर्ल्डकपची तयारी लक्षात घेऊन निवड समिती आता तरूण खेळाडूंना टीममध्ये संधी देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध खेळला जाणारा तिसरा वनडे सामना हा हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांवर आता BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिलीये.
रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलंय. पीटीआयशी बोलताना त्यांनी म्हटलंय की, रोहितच्या निवृत्तीबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या केवळ अफवा आहेत.
सैकिया यांनी सांगितलं की, लॉर्ड्सवर रविवारी होणारा वनडे सामना हा रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे, अशी कोणतीही चर्चा बोर्डात झालेली नाही. रोहित हा भारतीय वनडे टीममधील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. टीमला त्याची गरज असेपर्यंत तो भारतासाठी खेळत राहणार आहे. त्यामुळे लॉर्ड्समधील सामना त्याचा अखेरचा सामना असल्याच्या चर्चांवर विश्वास ठेवू नका.
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे सिरीजमध्ये रोहित शर्माला अजून साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या दोन वनडेमध्ये त्याने अनुक्रमे 11 आणि 26 रन्स केलेत. गेल्या वर्षी त्याच्याकडून वनडे टीमचं कर्णधारपद काढून शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर निवड समिती टीमच्या भविष्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती.
रोहितने यापूर्वीच दोन आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. 29 जून 2024 रोजी भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकवून दिल्यानंतर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर 7 मे 2025 रोजी इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याने टेस्ट क्रिकेटलाही अलविदा केला होता.
रोहित शर्मा हा भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2023 च्या वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. यावेळी त्याने कर्णधार म्हणून रोहितने टीमला पहिल्याच सामन्यापासून एक चांगली सुरुवात करून दिली होती. त्याचा भारतीय टीमला मोठा फायदाही झाला. याच खेळाच्या पद्धतीमुळे भारताने 2024 चा टी-20 वर्ल्डकप जिंकला आणि त्यानंतर 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवरही नाव कोरलं.
2017 ते 2025 या कालावधीत रोहित शर्माने तिन्ही फॉरमॅट मिळून भारताचं 142 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यापैकी भारताने तब्बल 103 सामने जिंकलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.