Jasprit Bumrah saam tv
Sports

शेवटी टीम इंडियासाठी वाईट बातमी आलीच; जसप्रीत बुमराह T20 वर्ल्डकपमधून 'आऊट'

टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सज्ज झाली आहे, पण एक वाईट बातमी समोर आली आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी धक्का देणारी बातमी आहे. टीम इंडियाचा हुकमी एक्का आणि यॉर्कर चेंडूनं भल्याभल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा जसप्रीत बुमराह मात्र स्वतःच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतून 'बाद' झाला आहे. (Jasprit Bumrah Is Ruled Out Of T20 World Cup 2022)

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरला टी-२० वर्ल्डकपची सुरुवात होणार असून टीम इंडिया या टुर्नामेंटसाठी सज्ज झाली आहे. काल रविवारी आफ्रिके विरुद्ध दुसरा टी-२० सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेवर वियज संपादन केलं. कर्णधार रोहित शर्माच्या संघात आनंदाचं वातावरण असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळणार नसल्याचं निश्चित झालं आहे. पाठिच्या दुखापतीमुळं बुमराह वर्ल्डकपला मुकला आहे. बुमराह वर्ल्डकप खेळणार नसल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

बीसीसीआयने काय म्हटलं?

बीसीसीआयने दिलेली माहिती अशी की, भारतीय संघाच्या मेडीकल टीमने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर केलं आहे. सर्व प्रकारच्या तपासणी अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पाठीच्या दुखापतीमुळं बुमराह आफ्रिके विरोधात होत असलेल्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयकडून लवकरच बुमराहच्या जागेवर नवीन खेळाडूला संधी दिली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT