LIVE मॅचमध्ये भारताच्या दिग्गज फलंदाजाला दिला धक्का; दोघेही भिडले, VIDEO व्हायरल

भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणला ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉनसनने भरमैदानात धक्का दिला.
Mitchell Johnson - Yusuf pathan
Mitchell Johnson - Yusuf pathan Saam TV
Published On

Mitchell Johnson Pushes Yusuf Pathan : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा प्रतिस्पर्धी संघांचे खेळाडू परस्परांना भिडतात. त्यांच्यावर काही सामन्यांच्या बंदीची कारवाईही झाली आहे. पण यावेळी भर मैदानात भिडणारे माजी क्रिकेटपटू आहेत. दोघे खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. इतकंच नाही तर, धक्काबुक्कीही झाली.

ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉनसन (Mitchell Johnson) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Cricket) निवृत्त झाला, पण इतक्या वर्षांनीही मैदानातील त्याचं वागणं बदललेलं नाही. लाइव्ह मॅच दरम्यान भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटूशी त्यानं भांडण उकरून काढलं. केवळ बाचाबाचीवरच तो थांबला नाही तर, त्यानं युसूफ पठाणला धक्काही दिला.

Mitchell Johnson - Yusuf pathan
IND Vs SA T20 : बाप रे बाप, मैदानात घुसला भलामोठा साप; KL राहुलचं लक्ष गेलं अन्...

लीजेंड्स लीग क्रिकेटच्या सामन्यात हा धक्कादायक प्रकार घडला. युसूफ पठाण आणि मिचेल जॉनसन यांच्यात बाचाबाची झाली. जॉनसनने युसूफ पठाणला धक्काही दिला. शेवटी वाद आणखी वाढू नये म्हणून संघ सहकारी आणि पंचांना मध्यस्थी करावी लागली. पंचांनी जॉनसनला बाजूला नेले. (Latest Marathi News)

जोधपूरमध्ये भिलवाडा किंग्ज आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात लीजेंड्स लीग क्रिकेटमधील क्वालिफायरचा सामना झाला. पठाण जेव्हा फलंदाजी करत होता, त्यावेळी जॉनसन त्याला काहीतरी बोलला. त्यावर पठाण भडकला आणि वाद निर्माण झाला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पठाण कमालीचा रागावला असून, जॉनसनला तो प्रत्युत्तर देत आहे. त्यानंतर जॉनसनने पठाणला धक्काच दिला.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा!

Mitchell Johnson - Yusuf pathan
भारताचा T-20 मालिकेवर कब्जा, आफ्रिकेचा सलग दुसरा पराभव, किलर मिलरची शतकी खेळी व्यर्थ

जॉनसनवर बंदीची शक्यता

दोघांमधील शाब्दिक चकमक नंतर धक्काबुक्कीवर गेली. अखेर पंचांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही खेळाडूंना बाजूला नेले. आयोजकही घडल्या प्रकारामुळे नाराज झाले असून, आयसीसीच्या नियमांनुसार, पठाणला धक्का दिल्याप्रकरणी जॉनसनवर एका सामन्याची बंदी लादण्याचा निर्णय घेण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जर असं झालं तर, जॉनसनला अंतिम लढत खेळता येणार नाही.

कॅपिटल्स फायनलमध्ये

दरम्यान, या सामन्यात गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने विजय मिळवला. कॅपिटल्सने २२७ धावांचं लक्ष्य पार करताना अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आता इरफान पठाणच्या नेतृत्वाखालील भिलवाडा संघाला विरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्सबरोबर एलिमिनेटर सामना खेळावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com