BCCI Central Contract Saam TV
क्रीडा

BCCI Central Contract: दिग्गजांवर BCCI नाराज तर नवख्यांवर मेहरबान!

वृत्तसंस्था

बीसीसीआयने बुधवारी केंद्रीय करार जाहीर केले आहेत. या अंतर्गत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना बीसीसीआयच्या ताज्या करारात ग्रेड A वरून B श्रेणीत टाकण्यात आले आहे. हार्दिक पांड्याही ए ग्रेडमधून सी ग्रेडमध्ये गेला आहे. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला कसोटी संघातून वगळल्यानंतर बीसीसीआयच्या केंद्रीय करारामध्ये बी ग्रेडमधून सी श्रेणीत टाकण्यात आले आहे. (BCCI Central Contract)

बीसीसीआयचा (BCCI) करार

A+: विराट कोहली, (Virat Kohli) रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह

A: रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत

B: चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा

C: शिखर धवन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल, हनुमा विहारी, युझवेंद्र चहल, सूर्य कुमार यादव, मयंक अग्रवाल, वृद्धिमान साहा, दीपक चहर

BCCI चे ग्रेड हे चार वर्गात असतात. ज्यात 'A+' मधील खेळाडूंना 7 कोटी रुपये तर A, B आणि C श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपये मिळतात. यानुसार पुजारा आणि रहाणे यांना खराब फॉर्ममुळे आता बी ग्रेडमध्ये टाकण्यात आले आहे, जे आधी ए ग्रेडमध्ये होते. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आले आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार 20 जानेवारीला त्याला खालच्या श्रेणीत टाकले जाईल असे वृत्त दिले. दरम्यान सर्वात मोठी धक्का दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या ग्रेडमध्ये झालीये. जो मागच्या करारात ग्रेड ए वरून थेट सी श्रेणीत ढकलला गेला आहे. वादग्रस्त यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहालाही कसोटी संघातून वगळण्यात आले आहे, त्याला बी श्रेणीतून क श्रेणीत हलवण्यात आले आहे पण तरीही त्याला एक कोटी रुपये मिळणार आहेत.

साहा केंद्रीय कराराच्या कलमांचे उल्लंघन केले होते

साहाने निवड प्रक्रियेदरम्यान सार्वजनिक टिप्पणी करून तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर वक्तव्य करून केंद्रीय कराराच्या कलमाचे उल्लंघन केले होते. तरीही तो भारताकडून पुन्हा खेळण्याची शक्यता नसल्याचे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले असतानाही त्याला क गटात ठेवण्यात आले आहे. असे असूनही त्याला एक कोटी रुपये मिळणार आहेत.

फिरकीपटू कुलदीप यादव बाद

फिरकीपटू कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हे याआधी या गटाचा भाग होते पण आता त्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. मयंक अग्रवालने कामगिरीत सातत्य राखले आहे, त्याला ग्रेड बी वरून सी मध्ये अपग्रेड करण्यात आले आहे. मोहम्मद सिराजला त्याच्या कामगिरीचा फायदा झाला आहे ज्यामुळे तो आता ब गटात आहे तर सूर्यकुमार यादव आता आवश्यक सामने खेळल्यानंतर क गटात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : मनसे नेते प्रकाश महाजन यांचं तहसील कार्यालयासमोर उपोषण

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

SCROLL FOR NEXT