indian womes cricket team twitter
क्रीडा

IND vs SA: भारत - दक्षिण आफ्रिकेत रंगणार वनडे, टी -२० अन् कसोटी मालिकेचा थरार! BCCI कडून वेळापत्रक जाहीर

South Africa Tour Of India: टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघामधील मालिकेची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

सध्या सर्वत्र टी -२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेची चर्चा सुरू आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघाच्या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेची सुरुवात १६ जूनपासून होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. त्यानंतर २८ जून ते १ जुलै दरम्यान एकमेव कसोटी सामन्याचा थरार लागणार आहे. यासह दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.

या तीनही फॉरमॅटसाठी भारतीय संघाचं कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपद स्मृती मंधानाकडे सोपवण्यात आलं आहे.या तीनही फॉरमॅटसाठी जेमिमा रॉड्रिग्ज आणि पूजा वस्त्राकर यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र दोन्ही खेळाडूंना ही मालिका खेळायची संधी मिळणार की नाही , हे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज , ऋचा घोष (यष्टिरक्षक), उमा छेत्री (यष्टिरक्षक), दयालन हेमलता, राधा यादव,आशा सोभना, श्रेयंका पाटिल, सायका इशाक, पूजा वस्त्राकर , रेणुका सिंग ठाकुर, अरुंधती रेड्डी, प्रिया पुनिया.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमा रॉड्रिग्ज , ऋचा घोष (यष्टिरक्षक), उमा छेत्री (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सेका इशाक, राजेश्वरी गायकवाड़, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर, मेघना सिंग, प्रिया पुनिया.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा छेत्री (यष्टिरक्षक), ऋचा घोष (यष्टिरक्षक), जेमिमा रॉड्रिग्ज ,सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटिल, राधा यादव, अमनजोत कौर, आशा सोभना, पूजा वस्त्रकार , रेणुका सिंग ठाकुर, अरुंधती रेड्डी.

राखीव खेळाडू- साइका इशाक.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT