team india social media
Sports

एकाच वेळी दोन मोठ्या घोषणा; इंग्लंडविरुद्ध वनडेआधीच टीम इंडियात बदल; झिम्बाब्वे दौऱ्यात 'चॅम्पियन'ला डच्चू

india zimbabwe t20 squad vaibhav suryavanshi retained : झिम्बाब्वेच्या विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद असेल. तर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी संघात कायम आहे.

Nandkumar Joshi

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाबाबत बीसीसीआयने दोन महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे ५ सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ वनडे मालिकेत आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा संपल्यानंतर झिम्बाब्वे दौरा होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी २० मालिका होईल. या दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात आश्चर्याचा धक्का देणारा बदल करण्यात आला आहे.

भारतीय संघाच्या पुढील दोन मालिकांसाठी निवड समितीने एकाच वेळी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यावर टी २० मालिका होणार असून, भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे इंग्लंडविरोधात होणाऱ्या वनडे मालिकेआधीच संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे सध्या चर्चेत असलेल्या वैभव सूर्यवंशीचीच सगळीकडे 'हवा' आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. अशोक शर्मा, प्रभसिमरन सिंग, यश ठाकूर यांना पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तर अनुभवी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

संजू सॅमसनला डच्चू

बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १५ सदस्यांचा संघ निवडला आहे. तीन सामन्यांची टी २० मालिका हरारेमध्ये होईल. कर्णधारपद श्रेयस अय्यरकडेच असेल. तिलक वर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंह, हर्ष दुबे, वरूण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. विकेटकीपरची मुख्य जबाबदारी ही इशान किशनकडे असेल.

प्रभसिमरन सिंग हा देखील संघात आहे. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव या दोघांचाही भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. अलीकडेच टी २० संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसनला यावेळी संधी मिळाली नाही. युवा खेळाडूंवर निवड समितीने विश्वास दाखवला आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे --

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरूण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग.

त्याचवेळी इंग्लंडविरोधात होणाऱ्या वनडे मालिकेसाठीही भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी याच्या जागी शिवम दुबे याला भारताच्या वनडे संघात स्थान देण्यात आलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -

शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर बरार, शिवम दुबे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार – जयकुमार गोरे

Chinchpokli Travel : विकेंड प्लान अजून झाला नाही? मुलांसोबत चिंचपोकळीजवळील 'या' ५ ठिकाणांची करा सफर

रोज फक्त फळे खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Momo Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चटपटीत मोमोज; वाचा रेसिपी

पोलिस चौकीवर भीषण बॉम्बस्फोट; 11 जणांचा मृत्यू, 30 जखमी

SCROLL FOR NEXT