RINKU SINGH TWITTER
Sports

Duleep Trophy 2024: रिषभ पंतच्या जागी रिंकू सिंगला मिळाली संधी! BCCI ची मोठी घोषणा

Duleep Tropy 2024 Updated Squad: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

भारतात देशांतर्गत क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली आहे. या हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेने झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी इंडिया ए विरुद्ध इंडिया बी, इंडिया सी विरुद्ध इंडिया डी या दोन्ही संघांमध्ये सामने पार पडले. दरम्यान नुकताच बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे.

भारतीय संघाला येत्या १९ सप्टेंबरपासून बांगलादेश विरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी शुभमन गिल, केएल राहुल, ध्रुव जुरेल,कुलदीप यादव आणि आकाश दीप यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू दुलीप ट्रॉफीतील दुसऱ्या फेरीत खेळताना दिसून येणार नाही. निवडकर्त्यांनी या खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे.

या खेळाडूंना मिळालं स्थान

निवडकर्त्यांनी शुभमन गिलची रिप्लेसमेंट म्हणून, प्रथम सिंगची निवड केली आहे. तर केएल राहुलची रिप्लेसमेंट म्हणून अक्षय वाडकर, ध्रुव जुरेलची रिप्लेसमेंट म्हणून एसके रशिद आणि कुलदीप यादवची रिप्लेसमेंट म्हणून शम्स मुलानीची निवड करण्यात आली आहे. तर आकाशदीपची रिप्लेसमेंट म्हणून आकिब खानचा संघात समावेश करण्यात आला आहे.

दुलीप ट्रॉफीतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांसाठी असे आहेत चारही संघ:

अपडेटेड इंडिया A संघ: मयंक अगरवाल (कर्णधार), रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, अवेश खान, कुमार कुशाग्र, शाश्वत रावत, प्रथम सिंह, शम्स मुलाणी, आकिब खान, अक्षय वाडकर, एस.के. रशीद,

इंडिया बी संघातील बदल:

यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत यांना बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्या जागी रिंकू सिंग आणि सुयश प्रभुदेसाई यांना स्थान देण्यात आलं आहे. तर यश दयाल पहिल्यांदाच भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याच्या जागी हिमांशू मंत्रेचा संघात समावेश करण्यात आला आहे.

अपडेटेड इंडिया B संघ:

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीशन (यष्टिरक्षक), सुयश प्रभुदेसाई, रिंकू सिंह, हिमांशू मंत्रे (यष्टिरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी.

अक्षर पटेल भारताच्या मुख्य संघात सामील होणार असल्याने, त्याची जागा निशांत सिंधू (हरियाणा सीए) घेणार आहे. तुषार देशपांडे दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी इंडिया A संघातील विद्वत कावेरेप्पाला स्थान देण्यात आले आहे.

इंडिया C संघात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

अपडेटेड इंडिया D संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व ताइडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सरांश जैन, अर्शदीप सिंह, आदित्य ठाकर, हर्षित राणा, आकाश सेनगुप्ता, के.एस. भारत (यष्टिरक्षक), सौरभ कुमार, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), निशांत सिंधू, विद्वत कावेरेप्पा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT