Duleep Trophy 2024: हर्षित राणावर BCCI बॅन लावणार? ती एक चूक महागात पडणार

Harshit Rana Flying Kiss Celebration: दुलीप ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात हर्षित राणाने एक चूक केली आहे, जी त्याला महागात पडू शकते.
Duleep Trophy 2024: हर्षित राणावर BCCI बॅन लावणार? ती एक चूक महागात पडणार
harshit ranatwitter
Published On

दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. एकीकडे इंडिया ए संघाचा सामना इंडिया बी संघाविरुद्ध सुरु आहे. तर इंडिया सी संघाचा सामना इंडिया डी संघाविरुद्ध सुरु आहे. ही स्पर्धा बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे.

दरम्यान पहिल्याच दिवशी स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. एकीकडे फलंदाज फ्लॉप ठरले. तर गोलंदाजांनी शानदार खेळ करुन दाखवला आहे. दरम्यान हर्षित राणाने देखील शानदार गोलंदाजी केली. मात्र विकेट घेतल्यानंतर त्याने एक मोठी चूक केली आहे.

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, इंडिया सी आणि इंडिया डी या दोन्ही संघांमध्ये सामना सुरु होता. त्यावेळी ऋतुराज गायकवाड फलंदाजी करत होता. तर हर्षित राणा गोलंदाजी करत होता. हर्षित राणाच्या शानदार गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाड संघर्ष करताना दिसून येत होता. अखेर राणाने ऋतुराज गायकवाडची विकेट मिळवलीच.

दरम्यान आऊट केल्यानंतर राणाने ऋतुराज गायकवाडकडे फ्लाईंग किसचा इशारा केला. फलंदाजाला आऊट केल्यानंतर फ्लाईंग किस करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने आयपीएलमध्ये असं केलं आहे आणि त्याला शिक्षाही झाली आहे. त्याच्यावर बॅन लावण्यात आला होता.

Duleep Trophy 2024: हर्षित राणावर BCCI बॅन लावणार? ती एक चूक महागात पडणार
Duleep Trophy: मुशीरच्या शतकानंतर Suryakumar Yadav चाही आनंद गगनात मावेना, हटके प्रतिक्रिया देत म्हणाला..

आयपीएलमध्येही केली होती अशीच चूक

आयपीएल २०२४ स्पर्धेत हर्षित राणा कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात हर्षित राणाने फ्लाईंग किसचा इशारा केला होता. या सामन्यात हर्षित राणाने मयांक अगरवालला बाद करत माघारी धाडलं होतं. d

Duleep Trophy 2024: हर्षित राणावर BCCI बॅन लावणार? ती एक चूक महागात पडणार
Duleep Trophy 2024: स्टार खेळाडूचा फ्लॉप शो सुरुच, टीम इंडियात संधी मिळणं कठीण

त्यावेळी मयांक अगरवाल बाद होऊन बाहेर जात असताना हर्षित राणाने त्याला पाहून फ्लाईंग किसचा इशारा केला होता. हर्षित राणाने केलेला हा इशारा पाहून दिग्गज भारतीय खेळाडू सुनील गावसकरही भडकले होते.

आयपीएलकडूनही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीदेखील त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात अभिषेक पॉरेलला बाद केल्यानंतरही पुन्हा एकदा इशारा केला होता. त्यामुळे त्याला दंड भरावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com