BCCI announced Team Indias central contract Saam tv
क्रीडा

BCCI Contracts: टीम इंडियाचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर, रवींद्र जडेजाला मिळालं प्रमोशन; केएल राहुलची घसरगुंडी

Team India Central Contract: केंद्रीय कराराच्या एकूण चार श्रेणींमध्ये एकूण २६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

Chandrakant Jagtap

BCCI Annual Contracts: बीसीसीआयने पुरुष संघासाठी टीम इंडियाचे वार्षिक कॉन्ट्रॅक जाहीर केले आहे. यात अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला त्यांच्या उत्तम कामगिरीचं बक्षिस मिळालं आहे. जडेजाचा समावेश A+ श्रेणीत करण्यात आला आहे. या श्रेणीत आता एकूण चार खेळाडू आहेत. यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह A+ मध्ये श्रेणीत होते आणि आता यात जडेजाचाही समावेश करण्यात आला आहे.

जडेजाला दमदार कामगिरीचे बक्षीस

केंद्रीय कराराच्या एकूण चार श्रेणींमध्ये एकूण २६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या श्रेणी A+, A, B आणि C आहेत. बीसीसीआयच्या या केंद्रीय करारातील दमदार कामगिरीचे बक्षीस रवींद्र जडेजाला मिळाले आहे. त्याचा समावेश A+ श्रेणीत करण्यात आला आहे.

केएल राहुलची घसरगुंडी

दुसरीकडे टीम इंडियाचा सलामीवर फलंदाज के एल राहुलला मात्र या कान्ट्रॅक्टमध्ये नुकसान झाले आहे. राहुलची ए मधून बी श्रेणीत घसगुंडी झाली आहे. याशिवाय शार्दुल ठाकूरलाही या कान्ट्रॅक्टमध्ये तोटा झाला आहे. शार्दुल याआधी बी श्रेणीत होता. परंतु आता त्याचा समावेश सी श्रेणीत करण्यात आला आहे.

हार्दिक पांड्या, अक्षर पटेललाही बढती

रवींद्र जडेजासोबत टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला देखील बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बढती मिळाली आहे. हार्दिकचा आता बी श्रेणीतून ए श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अक्षर पटेलही आता अ श्रेणीत आला आहे.

याशिवाय सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांचा समावेश सी श्रेणीतून बी श्रेणीत करण्यात आला आहे. तसेच संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, इशान किशन आणि केएस भरत यांचा सी श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. (Latest Sports News)

या खेळाडूंना नाही मिळाले कॉन्ट्रॅक्ट

बीसीसीआयने वार्षिक कॉन्ट्रॅक्टमध्ये काही वरिष्ठ खेळाडूंचा समावेश केलेला नाही. या यादीत अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमार ही दोन मोठी नावे आहेत. याशिवाय इशांत शर्मा, मयंक अग्रवाल यांना देखील कॉन्ट्रॅक्ट मिळाले नाही.

कोणत्या श्रेणीत मिळते किती मानधन

बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये A+ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक मानधन दिले जाते. या श्रेणीत बीसीसीआयकडून खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये दिले जातात, तर ए श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी मिळतात. याशिवाय बी श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी आणि सी श्रेणीतील खेळाडूला वार्षिक १ कोटी मानधन दिले जाते.

ग्रेड ए प्लस - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

ग्रेड ए - हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल.

ग्रेड बी - लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल.

ग्रेड सी - शिखर धवन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT