ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार, सूर्य देव हा एकमेव दृश्यमान देव आहे. शास्त्रांमध्ये, सूर्य देवाला आत्मा, आत्मविश्वास, आरोग्य, वडील, नेतृत्व क्षमता, सरकारी काम आणि आदर यांच्याशी जोडले आहे.
सूर्यला दररोज पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे. परंतु अनेक लोकांना सूर्याला पाणी अर्पण करण्याची योग्य पध्दत माहित नाही ती जाणून घ्या.
रोज सकाळी उठल्यावर सूर्य देवाची पूजा केल्याने कुटूंबात आणि समाजात आदर मिळण्यास सुरुवात होते.
सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी पाणी अर्पण करावे.
जे लोक सूर्य देवाला पाणी अर्पण करतात, त्यांनी सूर्योदयापूर्वी अंथरुण सोडावे.
सूर्याला पाणी अर्पण करताना तांब्याच्या भांड्याचा वापर करावा.
पाणी अर्पण करताना, ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः इत्यादी सूर्यमंत्रांचा जप करत राहावे.
ज्यांच्या कुंडलीत सूर्य चांगल्या स्थितीत नाही त्यांनी दररोज सूर्याची पूजा करावी. असे केल्यास सूर्याचे दोष दूर होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. कोणतीही माहिती स्विकारण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या.