Ravindra Jadeja Failed Bat Size Test saam tv
Sports

Ravindra Jadeja: जोरात बॅट जमिनीवर आपटली आणि...; अंपायरने जडेजाला फलंदाजीपासून रोखलं, पाहा सामन्यादरम्यान मैदानावर नेमकं काय झालं?

Ravindra Jadeja Failed Bat Size Test: सनरायझर्सविरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच सामन्यादरम्यान रविंद्र जडेजा आणि अंपायरमध्ये एक घटना घडली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शुक्रवारी एमए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात सनरायझर्सने चेन्नईचा दारूण पराभव केला. या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफ गाठणं जवळपास अशक्य झालंय. दरम्यान या सामन्यामध्ये अशी एक घटना घडली ज्यामध्ये चेन्नईचा खेळाडू रविंद्र जडेजाला अंपायरने फलंदाजी करू दिली नाही.

शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अंपायरकडून रविंद्र जडेजाच्या बॅटची तपासणी करण्यात आली. यावेळी जडेजा बॅट गेज टेस्टमध्ये फेल झाल्याचं समोर आलं. जडेजा पॉवर प्लेमध्ये नंबर ४ वर फलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी मैदानी अंपायर तातडीने त्याची बॅट तपासली.

यावेळी जडेजाची बॅट मेजरमेंट टूलमधून बाहेर आली नाही. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराऊंडर जडेजा काहीसा नाराज देखील दिसला. त्याने बॅट जोरात जमिनीवर आपटली. जेणेकरून बॅट मेजरमेंट टूलमधून बाहेर येईल. मात्र त्याचे प्रयत्न फोल ठरले. म्हणजेच बॅट टेस्टमध्ये रविंद्र जडेजा फेल झाला.

बॅट बदलण्याचा अंपायरचा सल्ला

मैदानावर असलेल्या अंपायरने जडेजाला बॅट बदलण्याचा सल्ला दिला. जडेजाने लगेच चेन्नई सुपर किंग्जच्या ड्रेसिंग रूमकडे इशारा केला आणि दुसरी बॅट मागवली. ही बॅट गेज टेस्टमध्ये पास झाली. जडेजा आयपीएल २०२५ मध्ये बॅट गेज टेस्टमध्ये फेल होणारा पहिला खेळाडू नाहीये. कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज सुनिल नरीन आणि एनरिक नॉर्खिया यांची बॅट गेज टेस्टमध्ये फेल झाली होती.

बीसीसीआयने आयपीएल २०२५ साठी बॅटच्या आकारवर लक्ष दिलं आहे. यापूर्वी बॅटच्या आकाराची तपाणी सामन्याच्या एक दिवसपूर्वी किंवा ड्रेसिंग रूममध्ये केली जात होती. खेळाडू चाचण्या आणि सामन्यांसाठी वेगवेगळ्या बॅट वापरण्याची शक्यता असल्याने, बीसीसीआयने अंपायर्सना खेळ सुरू होण्यापूर्वी खेळाडूंच्या बॅटचा आकार तपासण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT