vijay shankar hardik pandya twitter
Sports

Baroda vs Tamilnadu: 6,6,6...विजय शंकरकडून Hardik Pandyaची धुलाई; पाहा VIDEO

Vijay Shankar 3 Sixes In Hardik Pandya Over: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत फलंदाजी करताना विजय शंकरने हार्दिकच्या षटकात ३ षटकार खेचले आहेत.

Ankush Dhavre

Syed Mushtaq Ali Trophy: भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत तामिळनाडू विरुद्ध बडोदा यांच्यात झालेल्या सामन्यात विजय शंकर आणि हार्दिक पंड्या यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.

तामिळनाडूकडून विजय शंकर फलंदाजी करत होता, त्यावेळी हार्दिक पंड्या गोलंदाजी करत होता. विजय शंकरने हार्दिकचा समाचार घेत एकाच षटकात १९ धावा चोपल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, तामिळनाडूच्या फलंदाजांनी बडोदाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडूने २० षटकअखेर २२१ धावा केल्या.

या सामन्यात बडोदाने नाणेफेक जिंकला आणि तामिळनाडूला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या तामिळनाडूच्या फलंदाजांनी बडोदाच्या गोलंदाजांचा चांगलाच झोड घेतला.

तामिळनाडूकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना बाबा अमरजीतने सलामीला फलंदाजी करताना २५ धावा केल्या. तर नारायण जगदिशनने ५७ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बुपती कुमारने २८ धावा केल्या.

कर्णधार शाहरुख खान या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३९ धावांची खेळी केली. तर विजय शंकरने २२ चेंडूंचा सामना करत ४ षटकारांच्या साहाय्याने ४२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या ६ गडी बाद २२१ धावांवर पोहोचवली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

तामिळनाडू- बाबा इंद्रजीत, एन जगदीशन (यष्टीरक्षक), बूपथी कुमार, ऋतिक ईश्वरन, शाहरुख खान (कर्णधार), विजय शंकर, एम मोहम्मद, वरुण चक्रवर्ती, रवीश्रीनिवासन साई किशोर, गुर्जपनीत सिंग, संदीप वॉरियर

बडोदा - निनाद अश्विनकुमार राठवा, मितेश पटेल (यष्टीरक्षक), शिवालिक शर्मा, क्रुणाल पंड्या (कर्णधार), अतीत शेठ, हार्दिक पंड्या, विष्णू सोलंकी, भानु पनिया, महेश पिठिया, राज लिम्बानी, लुकमान मेरीवाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

SCROLL FOR NEXT