IND vs BAN, Chennai Pitch Report saam tv
Sports

IND vs BAN: बांगलादेशाने जिंकला टॉस, भारत करणार फलंदाजी; चेन्नईचं पीच कोणाला ठरणार फायदेशीर?

IND vs BAN, Chennai Pitch Report: चेन्नईच्या मैदानावर आज भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना रंगणार आहे. टॉस गमावल्यामुळे टीम इंडिया पहिल्यांदा फलंदासाठी मैदानात उतरणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

IND vs BAN Bangladesh Elected to Bowl first after Winning Toss: अखेर क्रिकेट प्रेमींना ज्या दिवसाची उत्सुकता होती तो दिवस आज आला. आजपासून भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना रंगणार आहे. चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असून बांगलादेशाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या मैदानाच पीच कसं आहे. यावेळी कोणाला या पीचचा फायदा होणार आहे, ते पाहूयात.

चेपॉकचं मैदान नेहमी स्पिनर्ससाठी फायदेशीर ठरतं, असं मानलं जातं. मात्र एका रिपोर्टनुसार, यावेळी हे पीच वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार हे पीच

यावेळी चेन्नईच्या मैदानावर वेगवान गोलंदाजाना चांगली मदत मिळू शकते. ESPNcricinfo च्या अहवालानुसार, चेपॉकमध्ये 9 प्रकारचे पीच असून 3 पीच हे लाल मातीचं आहे. ही माती मुंबईहून आणली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टेस्ट सामना या तीन लाल मातीच्या पीच पैकी एकावर खेळवला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाल मातीचं पीच वेगवान गोलंदाजांसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. कारण नवीन चेंडू याठिकाणी खूप स्विंग होतो.

लाल मातीचाच का केला वापर?

आता सर्व चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, पीचसाठी भारताने लाल मातीचा निर्णय का घेतला? दरम्यान टीम इंडियाला या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया विरूद्ध ५ सामन्यांची टेस्ट सिरीज खेळायची आहे. त्या ठिकाणी वेगवान गोलंदाजांना बाऊंसमध्ये मदत मिळू शकते. या सिरीजचं महत्त्व लक्षात घेता लाल मातीचा वापर करण्यात आला आहे.

भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील हेड-टू-हेड

  • एकूण टेस्ट सामने- १३

  • भारताचा विजय-११

  • बांगलादेशाचा विजय- ०

  • ड्रॉ - २

कशी आहे टीम इंडियाची प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT