BANGLADESH YANDEX
Sports

IND vs BAN: बांगलादेश संघाची घोषणा, स्टार खेळाडूला बसवलं; पाकिस्तानला हरवले, आता टीम इंडियाला टक्कर देणार!

Bangladesh Squad For IND vs BAN Test Series: भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

Bangladesh Test Squad, IND vs BAN: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेशने आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेत नजमुल हुसेन शांतो बांगलादेश संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

तसेच या मालिकेसाठी जाकीर अलीला देखील संधी देण्यात आली आहे. तर शोरफुल इस्लामला संघाबाहेर करण्यात आलं आहे. भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ १९ सप्टेंबरला आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

बांगलादेश संघाने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला पाकिस्तानात जाऊन पराभूत केलं आहे. मात्र भारतीय संघाला भारतात येऊन हरवणं बांगलादेश संघासाठी सोपं नसणार आहे. भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी बांगलादेशने युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे.

या खेळाडूंना मिळालं स्थान

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक आणि महमुदुल हसन यांना देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. या मालिकेसाठी बांगलादेशने नवख्या खेळाडूला स्थान दिलं आहे. जाकीर अली पहिल्यांदाच बांगलादेशकडून खेळताना दिसणार आहे. तो पहिल्यांदाच खेळण्यासाठी मैदानात येणार असला, तरीदेखील त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा बराच अनुभव आहे.

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे बांगलादेशचा संघ:

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन,नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम.

मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT