cricket coach death Saam tv
Sports

सामना सुरू होण्याआधीच क्रिकेट कोचचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; क्रीडाविश्वावर शोककळा

cricket coach death : सामना सुरू होण्याआधीच क्रिकेट कोचचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कोचच्या मृत्यूने क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

बांगलादेश प्रीमियर लीगच्या सामन्याआधी घडली दु:खद घटना

क्रिकेट कोचचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सामन्याआधी कोचचा मैदानात जमिनीवर कोसळून मृत्यू

बांगलादेश प्रीमियर लीगच्या सामन्याआधी एक दु:खद घटना घडली. ढाका कॅपिटल्सचे सहायक कोच महबूब अली जाकीचा सिलहट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. राजशाही वॉरियर्सच्या विरोधात सामन्याआधी कोचचा मैदानात जमिनीवर कोसळून मृत्यू झाला.

कोच महबूब जमिनीवर कोसळल्यानंतर टीम स्टाफ आणि मेडिकल कर्मचाऱ्यांनी सीपीआर दिला. त्यानंतर कोचला रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

कोच जमिनीवर कोसळल्यानंतर स्टेडियममधील प्रेक्षक एकच स्तब्ध झाले. ढाका टीमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाकी यांनी याआधी कोणतीही आरोग्याविषयी तक्रार सांगितली नव्हती. ढाका कॅपिटल्स सहायक कोच महबूब अली जाकी हे स्टेडियममध्ये मैदानात कोसळल्यानंतर इतर संघाचे खेळाडू त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.

सिलहट टायटन्स, नोआखाली एक्स्प्रेस आणि चट्टोग्राम रॉयल्सचे खेळाडू त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. तर २०१६ साली टी२० वर्ल्ड कपच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी तस्कीन अहमदच्या बॉलिंग अॅक्शनवर सवाल उपस्थित केले होते.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं की, 'बीसीबी गेम डेव्हलमेंट पेस बॉलिंग कोच महबूब अली जाकी यांच्या निधनावर बांगलादेश क्रिकेट बोर्ड शोक व्यक्त करत आहे. त्यांचं आज सिलहटमध्ये निधन झालं. त्यांचं वय ५९ वर्षे होतं'

ते एक जलद गोलंदाज होते. त्यांनी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये कोमिला जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व केलं होतं. जाकी यांनी ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर कोचिंग आणि खेळाडूंच्या विकासासाठी कोच म्हणून काम करू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईसाठी परप्रांतिय स्टार प्रचारक, युपी-बिहारचे नेते करणार मुंबईत प्रचार

Maharashtra Politics: अजित पवार युतीमध्ये अयशस्वी; शरद पवार गटाने मविआसह ठरवला फॉर्म्युला

Maharashtra Live News Update: वसंत मोरे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Maharashtra Politics : शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जाणार नाही; बड्या नेत्याचा दावा

वाळू उपसण्यासाठी जिलेटीनचा वापर! रेती माफियांवर महसूल विभागाची सर्जिकल स्ट्राईक|VIDEO

SCROLL FOR NEXT