mayank yadav twitter
Sports

IND vs BAN: 'आम्ही नाही घाबरत, त्याच्यासारखे आमच्या नेट्समध्ये...' मयांक यादवबद्दल हे काय म्हणाला बांगलादेशचा कर्णधार

Hossain Shanto On Mayank Yadav: बांगलादेशचा कर्णधार हुसेन शांतोने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मयांक यादवबद्दल मोठं वक्तव्य केलंय.

Ankush Dhavre

Mayank Yadav News: आयपीएल २०२४ स्पर्धेत आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मयांक यादवला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.

या सामन्यातील पहिल्याच षटकातील सर्व चेंडू त्याने ताशी १४० किमीच्या गतीने टाकले. यादरम्यान त्याने एकही धाव खर्च केली नव्हती. त्यानंतर दुसऱ्याच षटकात त्याने बांगलादेशचा अनुभवी फलंदाज महमदुल्लाहला माघारी धाडलं. दरम्यान दुसऱ्या सामन्याआधी बांगलादेशच्या कर्णधाराने मयांक यादवबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

मयांक यादवने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने २१ धावा खर्च केल्या आणि १ गडी बाद केला. त्याची ही शानदार कामगिरी पाहता तो दुसऱ्या सामन्यातही खेळताना दिसून येऊ शकतो.

दरम्यान मयांक यादवबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत बोलताना, बांगलादेशचा कर्णधार शांतो म्हणाला की, 'आमच्या नेट्समध्ये असे गोलंदाज आहेत. त्यामुळे आम्हाला त्याच्या गोलंदाजीतील गतीचं टेन्शन नव्हतं. मात्र तो एक चांगला गोलंदाज आहे.'

मालिकेतील पहिल्या सामन्याबाबत बोलायचं झालं, तर या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा डाव अवघ्या १२७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ गडी राखून शानदार विजय मिळवला.

मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत २- ० ने विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर बांगलादेशचा संघ मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT