Bajrang Punia Saam Tv
क्रीडा

Bajrang Punia: ब्रिजभूषण शरण सिंहशी पंगा घेणारा पैलवान ऑलिम्पिक पात्रतेच्या शर्यतीतून बाहेर

olympics Wrestling : पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेतून बजरंग पुनिया बाहेर झालाय. बजरंग पुनियाला पात्रता फेरीत पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर रोहित आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Bharat Jadhav

Wresters Bajrang Punia Out from Paris olympics :

कुस्ती खेळाच्या चाहत्यांसाठी एक दु:खाची बातमी आहे. आगामी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकबाबत मोठी बातमी समोर आलीय. या स्पर्धेतून पैलवान बजरंग पुनिया बाहेर झालाय. त्याच्यासह रवी पेरिसही पात्रता फेरीत बाद झालाय. आता सुजित कलकल या वजनी गटात ऑलिम्पिक कोटा गाठण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर रोहित आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.(Latest News)

आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी सामन्यात पराभूत झाल्यानंतर बजरंग पुनिया ऑलिम्पिक पात्रतेच्या शर्यतीतून बाहेर झालाय. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI)माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या बजरंगला पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. पैलवान रोहित कुमारकडून त्याचा १-९ असा पराभव झाला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी रविंदरविरुद्ध झालेल्या सामन्यात बजरंगने विजय मिळवला होता. जर रविंदरने सामन्यात वॉर्निंग पॉइंट गमावला नसता तर बजरंग पहिल्याच सामन्यात बाद झाला असता. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर बजरंगने रागाच्या भरात भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्र सोडलं. दरम्यान चाचण्यांच्या तयारीसाठी बजरंगने रशियात प्रशिक्षण घेतले होतं.

या चाचण्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या तदर्थ पॅनेलद्वारे आयोजित केल्या जात आहेत. दरम्यान निलंबित WFI ला चाचण्या घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हणत बजरंगने मात्र दिल्ली उच्च न्यायालयात खटला जिंकला होता. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) च्या अधिकाऱ्यांनी बजरंगचे डोपचे नमुने गोळा करण्याचा प्रयत्न केला पण तो तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाच्या स्पर्धेसाठीही थांबला नाही.

चाचणी सामन्यात पुरुषांची ५७ किलो (नॉर्डिक फॉरमॅटमध्ये) ही श्रेणीतील सामना खूप आव्हानात्मक राहिला. या सामन्यात टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते रवी दहिया आणि अमन सेहरावत हे दोघेही शर्यतीत होते. दुखापतीतून परतणाऱ्या दहियाला पहिल्या उच्च-स्कोअर सामन्यात अमनकडून १३-१४ असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान दोन्ही पैलवान छत्रसाल स्टेडियममधून प्रशिक्षण घेत होते. जेव्हा दहिया स्पर्धेत भाग घेत नव्हता तेव्हा अमन २०२३ मध्ये जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये पदके जिंकत चर्चेत राहिला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अमनने शेवटच्या क्षणात दहियाचे वर्चस्व संपुष्टात आणत सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT