Babar Azam Buys Sherwani saam tv news
Sports

Babar Azam: वर्ल्डकप सुरु असतानाच बाबरला लगीन घाई! खरेदी केली तब्बल ७ लाखांची शेरवानी

Babar Azam Buys Sherwani: बाबर आझमने वर्ल्डकप सुरु असतानाच लग्नाची शॉपिंग केली आहे.

Ankush Dhavre

Babar Azam Buys Sherwani:

भारतात सध्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. मंगळवारी (३१ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ७ लाखांची शेरवानी खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे.

पाकिस्तानचा संघ सध्या कोलकात्यात आहे. माध्यमातील वृत्तानूसार एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या लाँजमध्ये बसून त्याने लाखो रुपयांची ज्वेलरी खरेदी केली आहे.ज्वेलरीसह त्याने सात लाख रुपयांची डिजाईनर शेरवानी देखील खरेदी केली आहे.

लवकरच अडकणार विवाह बंधनात..

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर बाबर आझम विवाह बंधनात अडकणार आहे. वर्ल्डकप सारखी मोठी स्पर्धा सुरु असताना कुठलाही पाकिस्तानी कर्णधार लग्नाची शॉपिंग करतोय हे यापूर्वी कधीही पाहायला मिळालेलं नाही. बाबर आझम शॉपिंगमध्ये व्यस्त असल्याने नव्या वादाला तोंड फुटू शकतं. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करु शकलेला नाही. (Latest sports updates)

पाकिस्तानचा जोरदार विजय..

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशकडून महमदुल्लाहने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली.

तर लिटन दासने ४५ धावांचे योगदान दिले. बांगलादेशचा संघ २०४ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून फखर जमानने ८१ धावांची खेळी केली. तर अब्दुल्ला शफिकने ६८ धावांची खेळी केली. या सामन्यात पाकिस्तानने ७ गडी राखून बाजी मारली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT