srilanka saam tv
क्रीडा

Asia Cup 2023: आशिया चषकावर कोरोनाचं सावट! प्रमुख संघातील २ क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण

Corona In Asia Cup 2023: ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्वच संघांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

Asia Cup 2023 Covid 19:

आगामी आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेला येत्या ३० ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे.

या स्पर्धेतील हाय व्हॉल्टेज सामना म्हणजेच भारत विरूद्ध पाकिस्तान सामना २ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

तर पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्वच संघांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

आशिया चषक स्पर्धेवर कोरोनाचं सावट..

आशिया चषक स्पर्धा सुरू व्हायला अवघे ५ दिवस शिल्लक आहेत. दरम्यान एक मोठी माहिती समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानूसार श्रीलंकेच्या २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

ज्यात सलमीवीर फलंदाज अविष्का फर्नांडो आणि यष्टीरक्षक फलंदाज कुसल परेराचा समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती पॉजिटीव्ह आली आहे.

अविष्का फर्नांडोला यापू्र्वी देखील कोरोनाची लागण झाली होती.गेल्या वर्षी श्रीलंका विरूद्ध झिम्बाब्वे यांच्यातील वनडे मालिकेपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती.

तर कुसल परेराला देखील दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. २ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती. मुख्य बाब म्हणजे श्रीलंकेने अजुनपर्यंत संघाची घोषणा केलेली नाही. (Latest sports updates)

आगामी आशिया चषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक...

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - ३० ऑगस्ट

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - ३१ ऑगस्ट

भारत विरुद्ध पाकिस्तान - २ सप्टेंबर

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - ३ सप्टेंबर

भारत विरुद्ध नेपाळ - ४ सप्टेंबर

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - ५ सप्टेंबर

सुपर-२४ सामने

अ १ विरुद्ध ब २ - ६ सप्टेंबर

ब १ विरुद्ध ब २ - ९ सप्टेंबर

अ १ विरुद्ध अ २ - १० सप्टेंबर

अ २ विरुद्ध ब १- १२ सप्टेंबर

अ १ विरुद्ध ब १ - १४ सप्टेंबर

अ २ विरुद्ध ब २ - १५ सप्टेंबर

अंतिम सामना - १७ सप्टेंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

SCROLL FOR NEXT