Australian open 2024 Rohan Bopanna  x
Sports

Australian Open 2024: ग्रँड सलाम ! ४३ वर्षीय बोपण्णानं मारलं Australian Openचं मैदान; जिंकला ग्रँड स्लॅम

Australian open 2024 : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने ४३ वर्षीय इतिहास रचलाय. रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनने ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ चा पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलंय.

Bharat Jadhav

Rohan Bopanna Australian Open 2024:

भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने ४३ वर्षीय इतिहास रचलाय. रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनने ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ चा पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलंय. बोपण्णा हा पुरुषांमध्ये ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. रोहन बोपण्णा-मॅथ्यू एबडेन जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावासोरी यांचा ७-६, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावलं.(Latest News)

दरम्यान रोहन बोपण्णाने कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात प्रथमच पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलंय. बोपण्णा दोनदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे (२०१३, २०२३) पण विजय नोंदवण्यात त्याला यश आले नव्हते बोपण्णाने २०१७ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोव्स्कीसह मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.

रोहन बोपन्ना पुरुष दुहेरी रॅकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचलाय. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला त्याला पद्म पुरस्कार देण्यात आला. रोहन बोपन्ना वयाच्या ४३ वर्षी चॅम्पियन बनलीय. एबडेनचे हे दुसरे पुरुष दुहेरी विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियन मॅक्स पर्सेलसोबत २०२२ मध्ये विम्बल्डन जिंकले होते. दरम्यान बोपन्ना-इबडेनच्या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावासोरी यांचा पराभव केला.

हा अंतिम सामना एक तास ३९ मिनिटे चालला. यात ७-६,७-५ असा सामना जिंकला. वयाच्या ४३ व्या वर्षीय बोपण्णा पुरुष टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम चॅम्पियन बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू देखील ठरला. त्याने जीन-ज्युलियन रॉजरचा विक्रम मोडला. त्याने २०२२ मध्ये मार्सेलो अरेव्होलासोबत फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीची ट्रॉफी जिंकली होती. रॉड लीव्हर एरिना येथे झालेला चुरशीचा ठरला. दुसऱ्या सेटच्या ११ व्या गेममध्ये वावसोरीने सर्व्हिस सोडली. यात जास्त ब्रेक पाईट नव्हते. दुसरी स्थान मिळवलेल्या या जोडीने या सामन्यात दोन पाईंट घेतले. परंतु इटलीच्या खेळाडूने त्याला वाचवलं. दुसरं गेममध्ये बोलेलीच्या सर्व्हिसवर वावासोरीने ३०-३० वर वॉली मारला परंतु बोपन्नाने तो फटका परतून लावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Walking: दररोज फक्त इतकंच चाला, राहाल फिट अँड फाइन; ढिगभर फायदे आणि आयुष्यही वाढेल

Konkan Food : कोकणात बनवतात तशी चमचमीत 'वालाची आमटी', गरमागरम भाताची चव वाढवेल

CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

Grahan Dosh: 2026 नव्या वर्षात या राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर; सूर्य-राहूचा अशुभ ग्रहण योग ठरणार धोकादायक

Dharmendra - Sunny Deol: 'बॉर्डर २'च्या टीझर लाँच दरम्यान सनी देओलचं डोळे पाणावले, नेमकं झाल काय? VIDEO

SCROLL FOR NEXT