ind vs aus saam tv news
Sports

World Cup Final Prediction: भविष्यवाणी खरी ठरली ! ६ महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणाला, 'IND - AUS फायनल खेळणार,पण..'

India vs Australia, World Cup 2023 Final: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने ६ महिन्यांपूर्वीच भविष्यवाणी केली होती की, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची फायनल खेळणार.

Ankush Dhavre

Mitchell Marsh World Cup 2023 Final Prediction:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. वर्ल्डकपचा सेमीफायनलचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ३ गडी राखून धुव्वा उडवला. यासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप फायनलचं तिकीट मिळवलं आहे.

ऑस्ट्रेलियाचं फायनलचं तिकीट कन्फर्म होताच, अष्टपैलू खेळाडूने सहा महिन्यांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.

वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी अंतिम फेरीत जाणारे २ संघ कोण याबाबत भविष्यवाणी केली होती. काहीचं म्हणणं होतं की, गतविजेते इंग्लंड आणि यजमान भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.

तर काहींचं म्हणणं होतं की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप फायनलचा सामना खेळवला जाईल. मात्र ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु असताना म्हटलं होतं की, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ फायनलमध्ये आमने सामने येतील. (Latest sports updates)

आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु असताना मिचेल मार्श म्हणाला होता की,'वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा पराभव करुन ऑस्ट्रेलियाचा संघ अपराजित राहिल. फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया २ गडी बाद ४५० तर भारतीय संघाचा डाव ६५ धावांवर संपुष्टात येईल.' भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ फायनल खेळणार ही भविष्यवाणी खरी ठरली. पण सामन्याचा निकाल काय असेल हे सामना झाल्यानंतर कळेलच.

ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये प्रवेश...

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हवी तशी तशी सुरुवात करता आली नव्हती. सुरुवातीच्या सलग ३ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. गुणतालिकेत तळाला गेल्यानंतर असं म्हटलं जात होतं की, ऑस्ट्रेलियाचा संघ टॉप ४ मध्ये प्रवेश करु शकणार नाही. मात्र ऑस्ट्रेलियाने दमदार कमबॅक करत टॉप ४ मध्ये प्रवेश केला आणि आता दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : मुलीसाठी बापाने हद्द पार केली; लोकप्रिय अभिनेत्रीचं केलं अपहरण, धमकी दिली अन्..., वाचा नेमकं प्रकरण

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

LIC Vima Sakhi : LIC ची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००, अट फक्त १०वी पास

Weather Forecast: आजचे हवामान! ५ राज्यांना पावसाचा इशारा, तर १८ शहरावर दाट धुक्याचे सावट, महाराष्ट्रात काय स्थिती?

आज निर्णय घेतलात तर बदलू शकतं भविष्य! १७ डिसेंबरचं पंचांग काय सांगतं?

SCROLL FOR NEXT