Australia vs India 2nd ODI saam tv
Sports

IND vs AUS: सिरीज जिंकायची असेल तर भारतासाठी 'करो या मरो'; १७ वर्षांचा विजयी रेकॉर्ड कायम ठेवणार टीम इंडिया?

Australia vs India 2nd ODI: आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतीय संघासाठी 'करो या मरो' असा आहे. पर्थमध्ये झालेला पहिला सामना भारताने गमावल्यामुळे, आजचा अॅडलेडमधील सामना जिंकणे टीम इंडियाला बंधनकारक आहे

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना आज एडिलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया कर्णधार मिचेल मार्श याने टॉस जिंकला असून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये २ मोठे बदल

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्शने टॉस जिंकला. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आल्याचं सांगितलं हे. तर दुसरीकडे टीम इंडियामध्ये कोणताही बदल झालेले नाहीत.

तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. अशा परिस्थितीत, हा सामना टीम इंडियासाठी करो किंवा मरोची परिस्थिती आहे. कारण जर भारत हा सामना हरला तर ते सिरीजही गमावणार आहेत. अशा परिस्थितीत, सामना खूप रंजक असेल. जर भारत हा सामना जिंकला तर सिरीज जिंकण्याच्या आशा जिवंत राहतील आणि शेवटचा सामना निर्णायक ठरेल.

एडलेडमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला

१७ वर्षांपासून २००८ पासून भारतीय क्रिकेट टीमने एडलेड ओव्हलवर पाच वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी चार जिंकले आहेत आणि एक अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. विराट कोहलीने अ‍ॅडलेडमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये खेळल्या गेलेल्या चार वनडे सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये त्याने शतकं झळकावली आहेत.

कशी आहे टीम इंडियाची प्लेईंग 11?

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता; तुमचे नाव तर नाही ना?

Heart disease risk factors: 99% हार्ट अटॅक येण्यामागे हे 4 घटक कारणीभूत; संशोधनातून स्पष्ट

Weekly Horoscope: या राशींसाठी एखादा मोठा निर्णय फायदेशीर ठरेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

आईने आधी 3 वर्षाच्या लेकराला संपवले, नंतर स्वतः ही केली आत्महत्या; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल

Maharashtra News Live Update: हिंगोलीत 48 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

SCROLL FOR NEXT