Aus vs Pak Twitter
Sports

Aus vs Pak, WC 2023: ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आधी धुतलं, नंतर गोलंदाजांनी रडवलं; विश्वचषकात पाकिस्तानवर मात करत कांगारुंचं जोरदार कमबॅक

Aus vs Pak: या सामन्यातून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर मात करत जोरदार कमबॅक केलं आहे.

Vishal Gangurde

Australia vs Pakistan World cup Match:

विश्वचषकात आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानचा १८ वा सामना रोमहर्षक झाला. या सामन्यातून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर मात करत जोरदार कमबॅक केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानला आधी धू-धू धुतलं. त्यानंतर गोलंदाजांनी रडवलं. या सामन्यात कांगारुंनी पाकिस्तानला ३०५ धावांवर गुंडाळत तब्बल ६२ धावांनी सामना जिंकला. (Latest Marathi News)

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानला ५० षटकात ९ गडी गमावून ३६७ धावांचं आव्हान दिलं होतं. वॉर्नर आणि मिचेलने पहिल्या विकेटसाठी २५९ धावांची भागीदारी रचली. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने १६९ धावांची तुफानी खेळी खेळली. तर पाकिस्तानच्या शाहीन अफरीदीने ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी अब्दुल्ला शफीक आणि इमाम उलने १३४ धावांची भागीदारी रचली. इमामने ७० धावा तर शफीकने ६४ धावा कुटल्या.

ऑस्ट्रेलियाने पहिली जोडी फोडल्यानंतर इतर खेळाडूंवर दबाव निर्माण झाला. ऑस्ट्रेलियाने २२ व्या षटकात पाकिस्तानला पहिला धक्का दिला. अब्दुल्ला ६४ धावांवर बाद झाला. तर पुढे इमाम ७० धावांवर बाद झाला.

पहिला गडी बाद झाल्यानंतर बाबर आझम देखील १८ धावांवर बाद झाला. बाबर आझमनंतर एका पाठोमाग एक गडी बाद झाले. मोहम्मद रिझवान (४६) आणि सऊद शकील (३०) धावांवर बाद झाले. पाकिस्तानने शेवटचे पाच गडी ३६ धावांच्या आतच बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला ३०५ धावांवर गुंडाळलं.

पाकिस्तानला दिलं ३६८ धावांचं आव्हान...

चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चुकीचा ठरवत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. ३३ षटक ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी मैदानावर टिकून राहिली. दोघांनी मिळून २५९ धावा जोडल्या.

डेव्हिड वॉर्नरने १२४ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक १६३ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने १४ चौकार आणि ९ षटकार मारले. तर मिचेल मार्शने १०८ चेंडूंचा सामना करत १२१ धावा केल्या. यादरम्यान त्याने १२१ धावा केल्या. या दोघांना सोडलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे ४०० धावांच्या उंबरठ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला ३६७ धावा करता आल्या.

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी या सामन्यात दमदार कमबॅक केलं. सुरुवातीच्या ३४ षटकात एकही फलंदाज बाद न करू शकलेला पाकिस्तानने शेवटच्या १४ षटकात ऑस्ट्रेलियाच्या ९ फलंदाजांना बाद केलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ५ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:कोजागरी पौर्णिमा निमित्त पुणे शहरातील उद्याने आज रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

Weather Update : पाऊस धुमाकूळ घालणार! २० राज्यांना सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्रात कसं असेल आज हवामान? वाचा

Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

Sunday Horoscope : कामात नवी संधी मिळेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sunday Horoscope: पैसा आणि नवी संधी, 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा रविवारच राशिभविष्य

SCROLL FOR NEXT