marcus stoinis twitter
Sports

Australia vs Oman, Highlights: स्टोइनिसची ऑलराऊंड कामगिरी! ओमानला नमवत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Australia vs Oman, News In Marathi: ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना ओमानविरुद्ध पार पडला. या सामन्यात मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ओमानवर ३९ धावांनी शानदार विजय मिळवला आहे. दरम्यान गोलंदाजीत ३ गडी बाद करणारा आणि फलंदाजीत नाबाद ६७ धावांची खेळी करणारा मार्कस स्टोइनिस हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला आहे.

बारबाडोसच्या केसिंग्टनस ओवलच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकला ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. सुरुवातीच्या १० षटकापर्यंत हा निर्णय योग्य असल्याचं दिसून आलं. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ओमानच्या गोलंदाजांवर तुटून पडले. ऑस्ट्रेलियाला २० षटकअखेर ५ गडी बाद १६४ धावा करता आल्या.

ओमानला हा सामना जिंकण्यासाठी १६५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना ओमानला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सामन्यातील पहिल्याच षटकात ओमानला मोठा धक्का बसला. प्रतिक आठवले बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर पाचव्या षटकात कश्यप प्रजापती बाद होऊन माघारी परतला. सहाव्या षटकात कर्णधार आकिब इलियासने देखील पॅव्हेलियनची वाट धरली.

ऑस्ट्रेलियाकडू फलंदाजी करताना मार्कस स्टोइनिसने नाबाद ६७ धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने ५६ धावा केल्या. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १६४ धावा केल्या. ओमानकडून आयान खानने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. तर मेहरान खानने २७ धावी केल्या. ओमानला २० षटकअखेर९ गडी बाद १२५ धावा करता आल्या. यासह ओमानला हा सामना ३९ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

SCROLL FOR NEXT