Australian Open Saamtv
Sports

Australia Open 2023: जोकोव्हिचने रचला इतिहास! जिंकले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद; राफेल नदालच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

ऑस्ट्रेलियन ओपन 2023 जिंकून नोव्हाक जोकोविचने इतिहास रचला आहे. त्याने विक्रमी 10व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन 2023 जिंकली आहे.

Gangappa Pujari

Australia Open 2023: ऑस्ट्रेलियन ओपन 2023 जिंकून नोव्हाक जोकोविचने इतिहास रचला आहे. त्याने विक्रमी 10व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन 2023 जिंकली आहे. पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत त्याने ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपासचा 6-3, 7-6, 7-6 असा पराभव केला. जोकोविच 22वे ग्रँडस्लॅम जिंकले आणि यासोबत त्याने राफेल नदालची बरोबरी केली. (Tennis)

नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद जिंकले. त्याने ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासवर विजय मिळवताना २२वे ग्रँड स्लॅम जिंकले. राफेल नदाल याच्यानंतर २२ ग्रँड स्लॅम जिंकणारा तो दुसरा पुरुष टेनिसपटू ठरला.

शारीरिक तंदुरुस्तीची कसोटी पाहणाऱ्या या फायनलमध्ये त्सित्सिपासने सर्बियन स्टारला जवळपास तीन तास झुंजवले. नोव्हाकने दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची ट्रॉफी उचलली. नोव्हाकने ६-३, ७-६ ( ७-४), ७-६ ( ७-५) अशी बाजी मारली.

ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मधील पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा सामना नोव्हाक जोकोविच आणि स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात खेळला गेला. अंतिम सामन्यात जोकोविचने शानदार सुरुवात करत पहिला सेट 6-3 अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार झुंज दिली, पण शेवटी जोकोविचने 7-6 अशा फरकाने विजय मिळवला.

दहाव्यांदा केला पराक्रम...

जोकोविचने 10व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल खेळली. याआधी जोकोविचने नऊ वेळा या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आणि प्रत्येक वेळी विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020 आणि 2021 मध्ये विजेतेपद पटकावले होते. 2022 मध्ये जोकोविच व्हिसाच्या कारणांमुळे ही स्पर्धा खेळू शकला नव्हता. त्यावेळस राफेल नदालने (Rafel Nadal) ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

SCROLL FOR NEXT