Aus Vs WI Saamtv
क्रीडा

Aus Vs WI 2nd Test: २७ वर्षांनंतर विजय... वेस्ट इंडिजने कांगारुंना पाणी पाजलं; दुसऱ्या कसोटीत धुव्वा उडवत रचला इतिहास

Gangappa Pujari

Australia Vs West Indies 2nd Test:

वेस्ट इंडिज संघाने ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अवघ्या ११ धावांनी थरारक विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह वेस्ट इंडिजने ऑस्टेलियाविरुद्ध २७ वर्षांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने कांगारुंना सामन्याच्या चौथ्या डावात २१६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. विंडिजने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला 207 धावांवर रोखलं.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात 216 धावांचे लक्ष्य होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा संघाने 2 गडी गमावून 60 धावा केल्या होत्या आणि चौथ्या दिवशी त्यांना विजयासाठी आणखी 156 धावा करायच्या होत्या. मात्र विंडीज संघाचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने अप्रतिम कामगिरी करत कांगारुंच्या फलंदाजांना जेरीस आणले.

त्याने जबरदस्त कामगिरी करत सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या. जोसेफने कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना आपले बळी बनवले. शामर जोसेफने 11.5 षटकात 68 धावा देत 7 बळी घेतले. कांगांरुंकडून स्टीव्हन स्मिथने चिवट फलंदाजी करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. स्मिथने टीमसाठी नाबाद 91 धावा केल्या.

शामर जोसेफ ठरला हिरो!

दरम्यान, डेब्यूटंट शामर जोसेफ या वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरला. या कसोटी मालिकेत शामरने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि एकूण 13 बळी घेतले. या डावात ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथने नक्कीच ९१ धावा केल्या पण इतर कोणत्याही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: रेडी टू स्ट्राइक...! अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला खिजवलं; खेळाडू फ्लॉप ठरताच केली 'अशी' पोस्ट

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT