rawalpindi twitter
Sports

AUS vs SA: पावसाने खोडा घातला! ऑस्ट्रेलिया- दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्यास सेमीफायनलमध्ये कोण जाणार?

AUS vs SA Semi Final Scenario: दक्षिण आफिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. हा सामना रद्द झाल्यास सेमीफायनलमध्ये कोण जाणार?

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सातव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार होते. मात्र हा सामना सुरु होण्यापूर्वीच दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे.

या सामन्यापू्र्वी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रावलपिंडीच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्याचे नाणेफेक देखील होऊ शकलेले नाही. या दोन्ही संघांनी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर पाऊस असाच राहिला, तर सामना ड्रॉ होऊ शकतो. असं झाल्यास कोणता संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो? जाणून घ्या.

सामना ड्रॉ झाल्यास कोण जाणार सेमीफायनलमध्ये?

जर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ड्रॉ राहिला, तर नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. यासह दोन्ही संघांचे गुण प्रत्येकी ३-३ होतील. जर सामना सुरु झाला आणि निकाल लागला, तर विजयी होणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. मात्र जर सामना ड्रॉ राहिला, तर सेमीफायनलमध्ये कोणता संघ जाणार, हे जाणून घेण्यासाठी शेवटच्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागेल.

ग्रुप बी मधील इतर संघांबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी आपला पहिला सामना जिंकला आहे. जर आज होणारा सामना ड्रॉ झाला, तर इंग्लंड आणि अफगाणिस्तानला पुढील सामने जिंकून ४ गुणांपर्यंत पोहोचावं लागेल. मुख्य बाब म्हणजे जर या सामन्यात पावसाने खोडा घातला, तर या दोन्ही संघांपैकी एका संघाचं स्पर्धेतून बाहेर पडणं फिक्स आहे.

जर हा सामना ड्रॉ झाला, तर इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांपैकी कुठल्याही संघाने पुढील दोन्ही सामने जिंकले,तर ४ गुणांसह तो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो.

भारत- न्यूझीलंडचा सेमीफायनलमध्ये प्रवेश

तर ग्रुप ए बद्दल बोलायचं झालं, तर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही संघांनी सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. हे दोन्ही संघ कोणत्या संघाविरुद्ध खेळणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT