pakistan twitter
क्रीडा

AUS vs PAK: पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय! 43 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

Australia vs Pakistan 2nd ODI : पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडेत शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

Australia vs Pakistan: येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २ हात करताना दिसून येणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका सुरु आहे.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने दमदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला १६३ धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर फलंदाजी करताना हे आव्हान पूर्ण करत मालिका १-१ ने बरोबरीत आणली. यासह पाकिस्तानने इतिहास रचला आहे.

या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचं गर्वाचं घर नक्कीच रिकामं झालं असेल. घरच्या मैदानावर खेळताना १६३ वर ऑलआऊट होणं आणि ९ विकेट्सने सामना गमावणं, याहून वाईट आणखी काय असू शकतं.

पाकिस्तानच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तान हा सामना १० विकेट्सने जिंकणार होता. मात्र अॅडम झाम्पाने पाकिस्तानला एकमेव धक्का दिला. शेवटी बाबर आझमने षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात पाकिस्तानकडून फलंदाजी करताना, सॅम अयूबने ७१ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने ८२ धावांची खेळी केली. तर अब्दुल्ला शफीकने ६९ चेंडूंचा सामना करत नाबाद ६४ धावांची खेळी केली. त्याला साथ देत बाबर आझमने नाबाद १५ धावांची खेळी केली.

पाकिस्तानने हा सामना ९ विकेट्सने आपल्या नावावर केला. हा पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानने १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये ६ गडी राखून पराभूत केलं होतं. आता पाकिस्तानने दिलेलं आव्हान २६.३ षटकात पूर्ण केलंय.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तर मॅट शॉर्टने १९ धावा केल्या आणि अॅडम झाम्पाने १८ धावा केल्या.

हॅरीस रउफने घेतलेल्या ५ आणि शाहीन आफ्रिदीने घेतलेल्या ३ विकेट्सच्या बळावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा डाव १६३ धावांवर संपुष्टात आणला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray :...तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडल्यास मला विचारा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

Maharashtra News Live Updates: मुंबादेवी मतदारसंघात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची छुपी युती?

CJI DY Chandrachud : कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा; निरोप समारभांच्या भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?

IND vs SA 1st T20I: यजमान दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळालं स्थान?

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून आली पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT