KL Rahul  Saam Tv
Sports

KL Rahul Six: दिल गार्डन गार्डन हो गया, KL Rahul ने मैदानाबाहेर Six मारताच अथियाने दिलेली Reaction होतेय व्हायरल - VIDEO

Athiya Shetty Reaction On KL Rahul Six: अथिया शेट्टीने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

RR VS LSG Highlights: जयपूरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने जोरदार कामगिरी करत राजस्थान रॉयल्स संघांवर १० धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्यात दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली. मात्र शेवटी लखनऊच्या गोलंदाजांनी बाजी मारली आणि राजस्थानवर विजय मिळवला.

दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलने एक खणखणीत षटकार मारला. त्यानंतर पत्नी अथिया शेट्टीने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, लखनऊ सूपर जायंट्स संघाची फलंदाजी सुरु असताना राजस्थान रॉयल्स संघाकडून युझवेंद्र चहल ९ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता.या षटकातील ५ व्या चेंडूवर कर्णधार केएल राहुल स्ट्राईकवर होता. (Athiya Shetty Reaction On KL Rahul Six)

त्यावेळी चहलने राहुलला फ्लाईटेड चेंडू टाकला. या चेंडूचा पुरेपूर फायदा घेत केएल राहुलने गुडघ्यावर बसून गगनचुंबी षटकार मारला. हा षटकार तब्बल १०३ मीटरचा होता. हा षटकार पाहून सामना पाहण्यासाठी आलेली केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टीचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती आनंदाने टाळ्या वाजवत असतानाचा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Latest sports updates)

केएल राहुलने केली ३९ धावांची खेळी...

या खेळपट्टीवर धावा करणं कठीण होतं. मात्र कर्णधार केएल राहुलने या डावात टिचून फलंदाजी करत ३९ धावांची खेळी केली.

त्याने या डावात १२१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ४ चौकार आणि १ षटकार मारला. या खेळीच्या जोरावर त्याने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा डाव ७ गडी १५४ धावांवर पोहचवला. (

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून काईल मेयर्सने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली.

आक्रमक फलंदाज निकोलस पुरनने २९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १५४ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. यशस्वी जैस्वालने ४४ तर जोस बटलरने ४० धावांचे योगदान दिले.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडीक्कनने २६ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाने मोठी खेळी न केल्याने राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना १० धावांनी गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT