Deepak Hooda Catch Video: 'सूपरमॅन' दीपक हुड्डा! एक कॅचने फिरवली मॅच - VIDEO

Best Catches In IPL: लखनऊच्या गोलंदाजांसह दीपक हुड्डा देखील या सामन्यात चर्चेचा विषय ठरला.
Deepak Hooda Catch
Deepak Hooda Catch Saam Tv
Published On

RR VS LSG Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. शेवटच्या षटकात सामन्यांचा निकाल लागतोय. तसेच विजयाच्या अगदी जवळ असलेला संघ पराभूत होतोय. असाच एक सामना बुधवारी पाहायला मिळाला.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सूपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात राजस्थान संघाला एकहाती विजय मिळवण्याची संधी होती.

मात्र लखनऊच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत राजस्थानचा तोंडचा घास हिसकावून घेतला. दरम्यान लखनऊच्या गोलंदाजांसह दीपक हुड्डा देखील या सामन्यात चर्चेचा विषय ठरला.

Deepak Hooda Catch
PBKS VS RCB IPL 2023: RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का! एक हाती सामना फिरवणारा फलंदाज होऊ शकतो बाहेर

दीपक हुड्डाचा अविश्वसनीय झेल..

राजस्थान रॉयल्स संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवण्यासाठी १९ धावांची गरज होती. त्यावेळी वेगवान गोलंदाज आवेश खान गोलंदाजी करण्यासाठी आला होता. आवेशच्या चौथ्या चेंडूवर युवा फलंदाज जुरेल फलंदाजी करत होता.

तो चांगल्याच टचमध्ये असल्याचे दिसून येत होते. त्यावेळी जुरेलने मिडविकेट आणि मिड ऑनच्या दिशेने एक मोठा फटका खेळला. चेंडूला चांगली हाईट मिळाली होती. चेंडू लांबही तितकाच गेला होता. (Deepak Hooda Catch)

असं वाटत होतं की, चेंडू ६ धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर जाईल. मात्र त्याचवेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या दीपक हुड्डाने डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

लखनऊ सुपर जायंट्स संघाने उभारला होता १५४ धावांचा डोंगर..

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून काईल मेयर्सने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली.

आक्रमक फलंदाज निकोलस पुरनने २९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १५४ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. यशस्वी जैस्वालने ४४ तर जोस बटलरने ४० धावांचे योगदान दिले.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडीक्कनने २६ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाने मोठी खेळी न केल्याने राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना १० धावांनी गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com