Asian games 2023 womens cricket final indian womens cricket team won gold by defeating srilanka  twitter
Sports

Asian Games 2023: सुवर्णकन्या! टीम इंडियाच्या रणरागिनी लंकेवर पडल्या भारी;थरारक विजयासह पटकावलं गोल्ड मेडल

India vs Srilanka Asian Games Final 2023: भारतीय संघाने अंतिम सामन्यात लंकेचा पराभव करत गोल्ड मेडल पटकावलं आहे.

Ankush Dhavre

India W vs Sri Lanka W Asian Games 2023 Cricket Final Highlights:

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. भारताच्या रणरागिनींनी भारताला क्रिकेटमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

सोमवारी(२५ सप्टेंबर) झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाने श्रीलंकेला पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर उपविजेत्या श्रीलंकेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधानाने ४५ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ४६ धावांची खेळी केली.

तर जेमीमा रॉड्रिग्जने ४० चेंडूंचा सामना करत ५ चौकारांच्या साहाय्याने ४२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर ७ गडी बाद ११६ धावा केल्या. (Latest sports updates)

श्रीलंकेला सुवर्णपदक जिंकण्यासाठी केवळ ११७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यात श्रीलंकेचा संघ अपयशी ठरला आहे. श्रीलंकेला २ ० षटकअखेर ८ गडी बाद केवळ ८७ धावा करता आल्या.

श्रीलंकेकडून हसीनी परेराने २२ चेंडूंचा सामना करत २५ धावांची खेळी केली. तर नीलाक्षी डी सिल्वाने २३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना तितास साधुने अवघ्या ६ धावा करत ३ गडी बाद केले. तर राजेश्वरी गायकवाडने २,दिप्ती शर्मा, पुजा वस्त्राकर आणि देविका वैद्यने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

भारतीय संघाची दमदार कामगिरी..

भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांपासून दमदार कामगिरी केली आहे. २०२२ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने रौप्यपदकावर नाव कोरलं होतं. अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT