Jyoti Yarraji saam TV
क्रीडा

Asian Games 2023 : चीनचा रडीचा डाव! भारताच्या ज्योती याराजीने 100 मीटर शर्यतीत ठासून मिळवलं रौप्य पदक, काय झाला ड्रामा?

प्रविण वाकचौरे

Asian Games 2023 :

आशियाई स्पर्धेत भारताची चमकदार कारगिरी सुरुच आहेत. रविवारी भारताने १५ पदके जिंकत शानदार कामगिरी केली. भारताच्या ज्योती याराजीने महिलांच्या १०० मीटर हर्डल्स शर्यतीत रौप्य पदक जिंकले. पण ज्योतीला हे पदक सहज मिळालं नाही. स्पर्धेनंतर मोठा वाद घालत ज्योतील हे पदक हिसकावून घेतलं आहे. यावेळी चीन्यांचा रडीचा डाव दिसून आला.

ज्योती याराजीच्या रौप्य पदकाबाबत बराच ड्रामा पाहायला मिळाला. ज्योतीला आधी या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. मात्र विरोधानंतर तिला रौप्य पदक देण्यात आले. (Latest sports updates)

नेमका वाद काय झाला?

महिलांच्या १०० मीटर हर्डल्स शर्यतीत ज्योती याराजी हिला प्रथम अपात्र ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्योतीने शर्यतीला चुकीची सुरुवात केल्याचं आधी सांगितलं गेले. मात्र, ज्योतीच्या विरोधानंतर दोन्ही स्पर्धकांनी शर्यतीत भाग घेतला. शर्यत संपल्यानंतर, ज्योती याराजीने १२.९१ वेळेसह कांस्यपदक जिंकले, तर यानी वू दुसऱ्या स्थानावर राहिली.

शर्यत संपल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर चिनी स्पर्धक यांनी वूला अपात्र ठरवण्यात आले आणि भारतीय अॅथलीट ज्योतीचे पदक कांस्य वरून रौप्यपदक झाले.

या वादावर अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अंजू बॉबी जॉर्ज म्हणाल्या, माझ्या संपूर्ण आयुष्यात अॅथलीट म्हणून मी हे कधीच पाहिले नाही. चिनी अधिकारी प्रथम एखाद्या खेळाडूला अपात्र ठरवतात आणि नंतर त्याला परत आणतात. चिनी धावपटू आधीच एक पाऊल पुढे आला होता, आम्ही लगेच विरोध केला. याबाबत ज्योती याराजीने म्हटलं की, मला नियमांची फारशी माहिती नाही पण मी चुकीची सुरुवात केलेली नाही.

भारताची रविवारी कामगिरी

भारतीय संघाने आशियाई क्रीडा २०२३ च्या ८ व्या दिवशी रविवारी तीन सुवर्णांसह १५ पदके जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेत एका दिवसात सर्वाधिक पदके जिंकण्याचा भारताचा हा विक्रम आहे. यापूर्वी २०१० मध्ये भारताने खेळांच्या १४ व्या दिवशी एका दिवसात ११ पदके जिंकली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT