Asian Games 2023 twitter
क्रीडा

Asian Games 2023: भारताचं नाव गाजतंय आशियाई क्रीडा स्पर्धेत; पदकांची संख्या ९० पार, पदकांच्या यादीत कितव्या स्थानी?

Ankush Dhavre

Asian Games 2023 Medals Tally 2023:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेच्या १३ व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी ५ पदकांची कमाई केली आहे. यासह पदकांच्या यादीत भारताने ९० चा आकडा पुर्ण केला आहे. हा आकडा १०० च्या पुढे जाऊ शकतो.

या स्पर्धेच्या १३ व्या दिवशी रिकर्व्ह इव्हेंटमध्ये भारतीय महिला तिरंदाजी संघाने वियतनामवर ६-२ ने विजय मिळवला. यासह कांस्यपदकावर नाव कोरलं आहे. तर पुरूषांच्या संघाने रौप्यपदकावर नाव कोरलं आहे.

पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीत एचएस प्रणॉयने कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. तर सपेक टकरा खेळात भारतीय महिला संघाने कांस्यपदक पटकावलं आहे. कुस्तीमध्येही भारताला पदक मिळालं आहे.

कुस्तीपटू सोनम मलिकने महिलांच्या ६२ किलोग्रॅम वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. या यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण भारतीय पुरूष क्रिकेट संघ आणि महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (Latest sports updates)

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेतील पदकांची यादी..

एकूण पदकं- ९१, सुवर्ण- २१ पदकं, रौप्य -३३ पदकं, कांस्य -३७ पदकं.

कांस्यपदक - महिला रिकर्व्ह तिरंदाजी (अंकिता भकत,भजन कौर, सिमरनजीत सिंग)

कांस्यपदक - बॅडमिंटन पुरूष एकेरी (एचएस प्रणॉय)

कांस्यपदक- सपेक टकराव

रौप्यपदक - पुरूष रिकर्व्ह (अतनु दास, धीरज बोम्मदेवरा आणि तुषार शेल्के)

कांस्यपदक - महिला कुस्ती ६२ किलोग्रॅम ( सोनम मलिक)

भारतीय संघ सध्या ९१ पदकांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. सर्वाधिक ३३३ पदकांसह चीन अव्वल स्थानी आहे. तर १५८ पदकांसह जपान दुसऱ्या आणि १५७ पदकांसह दक्षिण कोरीया तिसऱ्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT