asian games 2023 day 4 live 25 meter pistol event isha singh won silver twitter
Sports

Asian Games 2023: भारतीय नेमबाज चमकली!ईशा सिंगला २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सिल्वर मेडल

Asian Games 2023 Day 4 Live: भारतीय नेमबाज ईशा सिंगने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023 Day 4 Live:

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरूच आहे. पहील्या दिवसापासून भारतीय खेळाडूंनी पदक जिंकायला सुरुवात केली आहे.

यावेळी भारतीय संघाने १०० पेक्षा अधिक पदकं जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे. या दिशेने वाटचाल करत चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी रौप्यपदक पटकावलं आहे.

चौथ्या दिवशी पटकावलं रौप्यपदक..

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय नेमबाज ईशा सिंगने २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.

ती सुवर्णपदक जिंकण्यापासून अवघ्या काही गुणांनी मागे राहिली आहे. चीनची नेमबाज लुई रियूने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

भारतीय नेमबाज ईशा सिंग,रिदम सांगवान आणि मनु भाकरने चौथ्या दिवशी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. या संघाने १७५९ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. तर १७५६ गुणांसह चीनने रौप्यपदकावर आणि १७४२ गुणांसह दक्षिण कोरीयाने कांस्यपदकावर नाव कोरलं.

त्याआधी आशी चौकसे, मानिनी कौशिक आणि सिफ्ट कौर समरा यांच्या संघाने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून भारताचे 15 वे पदक जिंकले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

Baramati By-Election: संजय राऊतांच्या विधानाने सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीही पडली बुचकळ्यात, पोटनिवडणुकीवर काय म्हणाले राऊत?

Gas Cylinder: LPG च्या नियमांमध्ये मोठा बदल, 'हा' फॉर्म भरल्यानंतरच मिळणार गॅस सिलिंडर

Konkan Tourism : कोकणातील 'या' समुद्रकिनारी घ्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद, थंडगार वाळूत करा तुफान मज्जा

SCROLL FOR NEXT