Rishabh Pant Saam Tv
Sports

आज हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार?

टीम इंडियाने आशिया कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. आज टीम इंडियाचा दुबईत हाँगकाँगशी सामना होणार आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: आशिया कप २०२२ मध्ये आज टीम इंडियाचा (Team India) सामना हाँगकाँग होत आहे. हा सामनाही दुबईतच होणार आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. या खेळ पट्टीवर मागील सामन्याप्रमाणेच वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते. या मैदानावर फलंदाजी करणे सोपे नाही.

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी मागील सामन्यासारखीच असणे अपेक्षित आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १४२ आहे तर दुसऱ्या डावाची १२४ आहे. वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी चांगली आहे. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनाही मदत मिळेल.

दुबई क्रिकेट ग्राउंड मोठे आहे पण तरीही चौकार आणि षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळतात. फलंदाजांनी सुरुवातीला काही षटके ठोकली, तर मधल्या षटकात धावा लवकर काढता येतात. या मैदानात शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा करता येतात. हार्दिक पंड्यानेही (Hardik Pandya) गेल्या सामन्यात हे दाखवून दिले आहे. आकडेवारीनुसार, पहिल्यांदा नाणेफेक जिंकणे आणि गोलंदाजी करणे हा या खेळपट्टीसाठी चांगला निर्णय असेल. आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत दुबईत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघालाच विजय मिळाला आहे.

हाँगकाँग विरुध्दच्या सामन्यात टीम इंडिया (Team India) नवा प्रयोग करु शकते. तसे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले आहेत. आजच्या सामन्यात ऋषभ पंत टीम मध्ये असण्याची शक्यता आहे. फिरकीपटूंमध्येही आर अश्विन किंवा रवी बिश्नोई यांना संधी मिळू शकते.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

हाँगकाँग : यासीम मोर्तझा, निझाकत अली (कर्णधार), बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेची, झीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला.

अशी प्लेइंग इलेव्हन असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT