Asia Cup 2025 Final, India vs Pakistan Playing 11 saam tv
Sports

Ind vs Pak final : पाकिस्तानविरुद्ध फायनलआधी भारताला ३ मोठे धक्के; दुखापतीचं संकट, प्लेइंग ११ बदलणार

Asia Cup 2025 Final, India vs Pakistan Playing 11 : आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ चार दशकांनी आमनेसामने येणार आहेत. पण या फायनलआधी भारताला तीन मोठे धक्के बसले आहेत. त्यामुळं टेन्शन वाढलं आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताची प्लेइंग ११ आता कशी असेल असा प्रश्न पडला आहे.

Nandkumar Joshi

  • आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान संघात फायनल

  • पाकिस्तानविरुद्धच्या फायनलआधी टीम इंडियाला हादरे

  • भारतीय संघातील तीन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त

  • फायनलच्या सामन्यात कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

ind vs pak final playing 11 prediction : भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आशिया कप २०२५ च्या फायनलमध्ये भिडणार आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी लढत दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र, अंतिम लढतीआधी टीम इंडियावर दुखापतीचं संकट कोसळलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला पराभूत करायचं असेल तर भारताची प्लेइंग ११ नेमकी कशी असेल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होणार का, असाही प्रश्न आहे. पण बदल झालाच तर त्यामागचं कारण काय असेल, पाकिस्तानला पराभूत करायचं असेल तर, टीम मॅनेजमेंट पुन्हा एकदा त्या खेळाडूंवर भरवसा दाखवणार का, ज्यांनी मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता? हे सगळे प्रश्न भारतीय प्रेक्षकांना पडले असतानाच, फायनलमध्ये भारताच्या प्लेइंग ११ मध्ये दोन बदल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीय संघावर दुखापतीचं संकट

श्रीलंका संघाविरुद्धच्या सुपर ४ मधील अखेरच्या सामन्यात भारतीय संघात तीन प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्याचं वृत्त होतं. दिलासादायक बाब म्हणजे ते सर्व खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी दुखापतीतून सावरतील आणि मैदानात उतरतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संघात होणाऱ्या संभाव्य बदलांमागे दुखापतीचं कारण असणार नाही. आता प्लेइंग ११ मध्ये संभाव्य बदल कोणते असतील, अशी चर्चा सुरू आहे.

प्लेइंग ११ मध्ये होणार दोन बदल?

पाकिस्तानविरुद्ध फायनलच्या सामन्यात भारताला तगडी प्लेइंग ११ मैदानात उतरावी लागणार आहे. सध्या तरी अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे दोन खेळाडू प्लेइंग ११ मधून बाहेर पडण्याची शक्यता दिसून येत आहे. हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्ध जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांच्या जागी खेळले होते. पाकिस्तानच्या विरोधात होणाऱ्या महामुकाबल्यात बुमराह आणि दुबे हे दोन्ही मॅचविनर खेळाडू खेळू शकतात. याआधी ओमानच्या विरोधात झालेल्या सामन्यातही व्यवस्थापनानं तेच केलं होतं. अर्शदीप आणि राणा यांना बुमराह आणि वरूणच्या जागी खेळवले होते. पण पुढच्याच सामन्यात बुमराह आणि वरूण यांचं कमबॅक झालं होतं.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११

जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांच्या पुनरागमनानंतर टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११ अशी असू शकते. अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या बाबतीत सांगायचे झाले तर, भारताविरुद्ध सुपर ४ मध्ये जे ११ खेळाडू उतरवण्यात आले होते, तेच या संघात असू शकतात.

फखर जमां, साहिबजादा फरहान, सॅम अयुब, हुसैन तलत, मोहम्मद नवाझ, सलमान आगा, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ, अबरार अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आघाडीची थाटात घोषणा पण आठ दिवसातच काडीमोड; वंचित-काँग्रेसचं काही जमेना

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

SCROLL FOR NEXT